महाड: सुट्टीसाठी घरी आलेल्या जवानाने महाडमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजेश पिलावरे या 33 वर्षीय जवानाने महाडमध्ये राहत्या घरी, स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र, त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

राजेश पिलावरे हे १० ऑक्टोबरला सुट्टी घेऊन आले होते. ते पंजाबमध्ये कार्यरत होते. मात्र, या दरम्यान त्यांची पत्नी दसऱ्यासाठी मुलांसह माहेरी गेलेली. यावेळी राजेश हे देखील पत्नीच्या माहेरी गेले आणि त्यांनी त्यांच्या सासऱ्यांकडे ठेवलेली स्वतःची बंदूक घेऊन घरी परतले .

शुक्रवारी त्यांची पत्नी घरी आल्यावर हा प्रकार समोर आला. दरम्यान, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.