Jalna Samruddhi Highway :  जालन्यात समृद्धी महामार्गात बाधित होणारे शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज जालना सिंदखेड राजा महामार्गावर देवमूर्ती येथे समृद्धी बाधित शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केलं. रस्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या आहे. जालना नांदेड समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या जमिनींना योग्य मोबदला देण्याच्या मागणीसाठी गेल्या 160 दिवसापासून आंदोलन सुरु आहे.

Continues below advertisement

समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीची दखल सरकार घेत नसल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आज जालना सिंदखेड राजा महामार्गावर देवमूर्ती येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केल आहे. समृद्धी महामार्गाचा दुसऱ्या टप्प्याचे काम सुरु करण्यात आले असून यात शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा; यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी आज ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. आज जालना सिंदखेड राजा महामार्गार देवमूर्ती येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले. दरम्यान या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे.

Continues below advertisement