Jalna Rain News : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही भागात पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. जालना जिल्ह्यात देखील अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमध्ये जालना जिल्ह्यातील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाली आहे.
जालना शहरात भिंत कोसळून 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव गावात 65वर्षीय महिला वाहून गेली आहे. सुमन गुडेकर आणि शारदाबाई शिरीसुंदर असे मृत वृद्ध महिलांची नावे आहेत. अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. जालना शहरांमध्ये आज झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे दोन महिलांना जीव गमावा लागला असून एक जण जखमी झाला आहे. जालना शहर तालुका आणि अंबड घनसावंगी तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाल असून त्याचबरोबर जीवितहानी देखील झालीय,जालना शहरातील चमडा बाजार परिसरामध्ये भिंत अंगावरती कोसळून सुमन घोडेकर या 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय तर बदनापूर तालुक्यातल्या देवपिंपळगाव गावात 65 वर्षीय महिला शारदाबाई शिरीसुंदर ही महिला पाण्यात वाहून गेली आहे. या महिलेचा मृतदेह अजूनही हाती लागला नसून एनडीआरएफ च्या टीमकडून पाहणी सुरू आहे.जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून पीक नुकसान जास्त झाल्याने दोन दिवसात नुकसानीचा अहवाल प्राप्त होईल अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी दिलीय.
मराठवाड्यात मोठा पाऊस सुरु
सध्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. विशेषत: मराठवाड्यात मोठा पाऊस सुरु आहे. बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. परभणी जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशीही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. काल दुपार पासून पावसाने उसंत घेतली होती मात्र आज सायंकाळी परत एकदा जोरदार पाऊस बरसलाय परभणी गंगाखेड पालम पूर्णा आदी तालुक्यात जोरदार पाऊस बरसला आहे ज्यामुळे ओढ्या नाल्यांना पुन्हा पुर आला आहे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान या पावसामुळे होत आहे.
परभणी जिल्ह्यातही मोठा पाऊस, शेती पिकांचं नुकसान
महत्वाच्या बातम्या:
Vidarbha Rain: विदर्भात मुसळधार पावसाचा कहर!धरणांचे दरवाजे उघडले,पूराच्या पाण्यात जनजीवन ठप्प,कुठे काय परिस्थिती?