Jalna News: माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Ravsaheb Danve) हे एका शाळेत चक्क गुरुजी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जालना जिल्ह्यातील जवखेडा या त्यांच्या गावामध्ये फेरफटका मारताना रावसाहेब दानवे यांनी गावच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला. 


यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांना पीपीटी प्रेझेंटेशन दाखवत त्यांनी विज्ञानाचे धडे दिले. दरम्यान, शिक्षणाचे महत्त्व सांगत विद्यार्थी आणि शिक्षकांची हितगुजदेखील केलं. शनिवारी रावसाहेब दानवे त्यांच्या जन्मगावी जवखेडा या गावी गेले होते, त्यावेळी त्यांनी शाळेत भेट दिली,10 वी च्या विद्यार्थ्यांचा विज्ञानाचा  ताससुरू होता यावेळी त्यांनी शिक्षकांशी बोलत , नंतर विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधला आणि धातू आणि अधातू याचं वर्गीकरण समजाऊन सांगितले


दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे 


माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील जवखेडा या त्यांच्या गावच्या शाळेत जाऊन दहावीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग घेतलाय. दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे देत सोप्या शब्दात विज्ञानातील सूत्र शिकवले. यावेळी विज्ञानाचे महत्त्व सांगत वर्गातील शिक्षकांशीही त्यांनी संवाद साधला.


विधानपरिषद निवडणूकीनंतर जालन्यातील जवखेडा गावात आले होते. यावेळी गावात फेरफटका मारताना गावच्या शाळेत जाण्याचा मोह त्यांना आवरला नाही. विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिकवत त्यांनी वर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 


राजकीय भूकंप झालाच, तर तो आम्हीच करणार


 विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होणार नाही, महायुतीचे सर्व आमदार एकत्र असून शंभर टक्के आमचेच सर्व उमेदवार निवडून येणार असा दावा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता. यावेळी राजकीय भूकंप झालाच तर तो आम्हीच करू विरोधकांकडून तो होऊ शकत नाही, असं देखील दानवे यांनी म्हटले. 


महायुती आणि मवाकडे एकूण किती आमदार?


महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीकडे सध्या एकूण 200 आमदार आहेत, तर महाविकास आघाडीकडे 65 आमदार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीला स्वबळावर उमेदवार निवडायचा असेल तर आणखी 4 मतांची गरज आहे, तर ठाकरे गटाला उमेदवार निवडायचा असेल तर 8 मतांची गरज आहे. भाजपा आपले चार उमेदवार स्वबळावर निवडून आणू शकतो. जर पाचवा उमेदवार निवडून यायचा असेल तर त्यांच्याकडे स्वतःची 8 मते असणे आवश्यक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पक्षाला आपापली मते गोळा करावी लागणार आहेत.


हेही वाचा:


Maharashtra MLC Election : घोडेबाजार होणार नाही, राजकीय भूकंप झालाच, तर तो आम्हीच करणार; भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्यांची डरकाळी!