Jalna : जालना महानगरपालिकेचे (Jalna Mahapalika) आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर (Santosh Khandekar) हे लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत. तक्रारदाराकडून कामाचे बिल पास करण्यासाठी मागितली तब्बल 10  लाख रुपयांची लाच देण्याची मागणी खांडेकर यांनी केली होती. यावेळी शासकीय निवासस्थानी 10 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ त्यांना पकडले आहे. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे. संतोष खांडेकर यांच्या घराची देखील झाडाझडती घेण्यात आली आहे.

Continues below advertisement

आयुक्तांना अटक होताच कंत्राटदारांनी ACB कार्यालयाबाहेर फोडले फटाके 

जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या अटकेनंतर जालन्यात कंत्राटदारांनी जालना एसीबी कार्यालयाबाहेर फटाके फोडून आपला रोष व्यक्त केला. जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी  बांधकामाचे बिल देण्यासाठी तक्रारदाराकडून दहा लाखाची लाच मागितली होती, यावेळी जालना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानी सापळा रचून ही लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक केलं. यानंतर काही कंत्राटदारांनी एसीबी कार्यालयासमोर फटाके फोडून आपला रोष व्यक्त केला, तसेच एसीबी अधिकाऱ्यांचे आभार मानले.

गेल्या आठवड्यात पोलीस हवालदाराने 5 लाखांची लाच मागितली होती, 3 लाखाची लाच स्वीकारताना अटक 

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये वर्दीला लाज आणणारी घटना घडली आहे. (Raigad Crime News) लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी असलेल्या पोक्सोअंतर्गत (POCSO) केसमध्ये कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने 5 लाखांची लाच मागितली. त्यातील 3 लाख रुपये स्वीकारताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. विशाल वाघाटे असे आरोपी पोलीस हवालदाराचे नाव आहे. ताब्यात घेतल्यानंतर याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे. राज्यभरात सध्या वारंवार लैंगिक अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या घटनासमोर येत असताना रक्षकच भक्षक झाल्याचे समोर आले आहे .या घटनेमुळे नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त होतोय.पोलीस हवालदाराने पोक्सो अंतर्गत प्रकरणात आरोपी विरोधात होणारी कारवाई टाळण्यासाठी आणि संबंधित पक्षाला मदत करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती .त्यापैकी तीन लाख रुपये स्वीकारताना  संबंधित हवालदार ACB च्या जाळ्यात आला . 18 वर्षाखालील बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनांमधील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी पोक्सो कायदा आहे . पोक्सो कायद्याअंतर्गतहोणारी कारवाई न करण्यासाठी हा हवालदार लाच स्वीकारत होता 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

वर्दीला लाज आणली ! पोक्सोअंतर्गत कारवाई न करण्याच्या बदल्यात आरोपीकडून 5 लाखांची लाच, ACB नं हवालदाराला रंगेहात पकडलं, नेमकं प्रकरण काय ?