धनगरांना फसवणाऱ्यांची घरं जाळा, नेपाळमध्ये जसं झालं त्या पलीकडे घडवा, सदावर्तेंच्या भेटीनंतर आंदोलक बोऱ्हाडेंचा इशारा
24 तारखेनंतर सरकार जर खबरदार झालं नाही तर नेपाळमध्ये जसं झालं त्या पलीकडे घडवा, असा इशारा धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे ( Deepak Borhade) यांनी दिला आहे.
Jalna : 24 तारखेनंतर सरकार जर खबरदार झालं नाही तर नेपाळमध्ये जसं झालं त्या पलीकडे घडवा, असा इशारा धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे ( Deepak Borhade) यांनी दिला आहे. ज्या दिवशी दिपक बोऱ्हाडेचा श्वास बंद होईल त्या दिवशी धनगर समाजाला फसवणाऱ्यांची घरं जाळून टाका असं म्हणत बोऱ्हाडेंनी चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. सरकार खबरदार... असे म्हणत धनगर उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. माझा श्वास चालू आहे तोपर्यंत धनगर समाजाला ST मधून आरक्षण द्या. 24 तारखेचा मोर्चा होईपर्यंत मी मरणार नाही असेही ते म्हणाले.
धनगर समाजाला फसवणाऱ्यांचे घरं जाळून टाका
जालन्यात गेल्या पाच दिवसांपासून धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांचं आमरण उपोषण सुरु आहे. धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हे उपोषण सुरु आहे. आज या उपोषणाला अँड गुणरत्न सदावर्ते यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांनी उपस्थित असणाऱ्यांना मार्गदर्शन करताना चिथावणीखोर वक्तव्य केलं. माझा श्वास 24 तारखेपर्यत सुरू राहील. 24 तारखेला धनगर समाजाचा इशारा मोर्चा आहे. या मोर्चानतंर देखील सरकार खबरदार झालं नाही तर धनगर समाजाला फसवणाऱ्यांचे घरं जाळून टाका असं आवाहन बोऱ्हाडे यांनी केलं आहे. शिवाय 24 तारखेनंतर नेपाळमध्ये झालं नाही त्या पलीकडे महाराष्ट्रात घडवा असंही बोऱ्हाडे म्हणाले.
24 तारखेला जालन्यात धनगर समाजाचा इशारा मोर्चा
धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालन्यात दिपक बोऱ्हाडे यांचं आमरण उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची तब्येत काहीशी खालवली. दरम्यान 24 तारेखेपर्यंत धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अन्यथा उद्रेक होईल असा इशारा आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांनी दिलाय. तर 24 तारखेला जालन्यात धनगर समाजाचा इशारा मोर्चा होणार असल्याच देखील दिपक बोऱ्हाडे यांनी म्हटलय. इंग्रजाच्या काळात जे समुदाय आदिवासी होते त्यांना अठराशे शतकात क्रिमिनल ट्राईब म्हणलं गेलं. त्या ट्राईब्सला देशात काश्मीरपासून कन्याकुमार पर्यंत शेड्युल ट्राईब संबोधल गेल. त्यामुळे धनगर एसटी है. आमच्याकडे गाड्या आल्या, चांगले कपडे घालू लागलो तर म्हणे धनगर मागास कसे? सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे एक निकाल दिला आहे. त्यात स्पष्टपणे लिहलंय, अनुसूचित जाती, जमातीत जे येतात त्यांच मागासलेपण तपासण्याची गरज नाही असेही सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:























