Jalgaon Pushpak Train Accident : जळगावमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथे चालत्या रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरल्याने काही प्रवाशांनी थेट खाली उडी मारली. यात काही प्रवासी समोरून येणार्या रेल्वेखाली येऊन मृत्युमुखी पडले आहेत. या दुर्गैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
पुष्कप एक्स्प्रेस मुंबईला चालली होती. जळगाव रेल्वेस्टेशन सोडल्यानंतर परधाडे रेल्वे स्टेशनच्या अगोदर रेल्वेने ब्रेक दाबलं. त्यामुळे चाकाचे रुळाशी घर्षण झाले. काही प्रवासी रेल्वेच्या दरवाजात बसले होते. त्यांनी हे घर्षण पाहिले. त्यांना वाटले पुष्पक एक्स्प्रेसला आग लागली. हे प्रवासी आग लागली आग लागली असं म्हणाले. त्यामुळे काही प्रवाशांनी रेल्वेच्या खाली उड्या घेतल्या. यावेळी समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. याच रेल्वेखाली चिरडली गेली. कापली गेली. आता नक्की किती प्रवाशांचा मृत्यू झाला, हे स्पष्ट झालेले नाही, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
आग लागल्याचे कान पडताच उड्या मारल्या
आग लागली असं मेमकं कोण म्हणालं हे नेमकं सांगता येत नाही. मात्र आग लागल्याचे कानी पडताच प्रवाशांनी रेल्वेतून खाली उड्या मारल्या, असंही या प्रवाशाने सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितले?
या घटनेनंतर एबीपी माझाने जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बातचित केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत सहा ते आठ प्रवासी समोरून येणाऱ्या रेल्वेखाली चिरडली गेली आहेत. तसेच दुर्घटनेच्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय मदत पाठवली आहे. तसेच जखमींवर उपचार करण्यासाठी रुग्णालये सज्ज ठेवण्यात आल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता?
सध्यातरी या दुर्घटनेत नेमके किती प्रवासी समोरून येणाऱ्या रेल्वेखाली चिरडले गेले आहेत, याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. मात्र सध्या वैद्यकीय मदत, रेल्वे पोलीस, जळगाव जिल्ह्याचे पोलीस दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचली आहेत. जखमींवर रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. दरम्यान, या दुर्घटनेची जलगाव जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी दखल घेतली असून योग्य ती मदत आणि कार्यवाही करण्याचा आदेश प्रशासनाला देण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ :
हेही वाचा :
Beed : आम्हाला न्याय देऊनच भेटायला या, देशमुख कुटुंबीयांची पंकजा मुंडेंकडे मागणी