जळगाव : जळगावात भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे.  किनगावजवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात टेम्पो पलटी होऊन हा भीषण अपघात झाला. यात आभोडा येथील 12 , केऱ्हाळा येथील 2 आणि रावेर येथील 2 असे 16 मजूर मृत्यूमुखी पडले आहेत तर  5 गंभीर जखमी झाले आहेत.  मध्यरात्रीच्या सुमारास किनगावजवळ आयशर टेम्पो पलटून हा अपघात झाला, ज्यात 16 जणांचा मृत्यू झाला. यातील बहुतांश मृतक हे रावेर तालुक्यातील असल्यानं तालुक्यावर शोककळा पसरली आहे.


माहितीनुसार या टेम्पोत पपई भरुन हा टेम्पो रावेरकडे निघाला होता. त्याचवेळी मध्यरात्रीच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्यानं टेम्पो पलटी झाला. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे.


(सविस्तर वृत्त लवकरच)