एक्स्प्लोर

Jalgaon News : चिमुकल्याने खेळताना मुकुट समजून ॲल्युमिनियमचं भांडं डोक्यात घातलं अन् भलतंच घडलं; डॉक्टरांनी धोका पत्करून प्लंबरच्या मदतीने यशस्वी सुटका!

Jalgaon News : खेळताना बालकाने ॲल्युमिनियमचे भांडे डोक्यात घातले. मात्र काही वेळातच भांडे डोक्यात व मानेजवळ इतकी घट्ट अडकले की त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्याने जोरात आरडाओरडा सुरू केला.

Jalgaon News : खेळताना लहान मुले काय उपद्व्याप करतील याचा भरोसा नसतो, अशीच एक धक्कादायक घटना जळगाव शहरात समोर आली आहे. खेळताना साडेतीन वर्षाच्या बालकाने ॲल्युमिनियमचे भांडे डोक्यात घातले. मात्र काही वेळातच भांडे डोक्यात व मानेजवळ इतकी घट्ट अडकले की त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्याने जोरात आरडाओरडा सुरू केला. घाबरलेल्या पालकांनी मुलाला घेऊन एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात धावपळ सुरु केली. भांडे काढताना गंभीर इजा होण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक डॉक्टरांनी हात वर केले.

Jalgaon News : ग्राइंडर कटरच्या साहाय्याने भांडे कापलं, 12 मिनिटांच्या प्रयत्नानंतर यश

अखेर मेहरूण परिसरातील सारा हॉस्पिटलचे डॉ. मीनाज पटेल यांनी धोका पत्करून उपचार करण्याचा निर्णय घेतला. भांडे काढताना बालकाला इजा होऊ नये यासाठी त्यांनी रुग्णालयात काम करणारे प्लंबर खालिद शेख यांना बोलावले. त्यांनी वुडन पीयूसी शीट आणि ओले कापड लावून सुरक्षितता उपाय करत ग्राइंडर कटरच्या साहाय्याने भांडे कापण्यास सुरुवात करण्यात आली. सुमारे 12 मिनिटांच्या प्रयत्नानंतर भांडे यशस्वीपणे कापून वेगळे करण्यात आले. काही तासांपासून घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या बालकाने आणि त्याच्या पालकांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Jalgaon News : जळगावच्या पेस IITच्या विद्यार्थ्यांचे 'जेईई परीक्षेत 'मध्ये दैदीप्यमान यश; अथर्व चव्हाणला 99.78% मार्क्स

जळगाव मधील पेस आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे 'जेईई परीक्षेत 'मध्ये दैदीप्यमान यश मिळवलं आहे. अथर्व चव्हाण याने 99.78% मार्क्स मिळवत खानदेशात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. परिणामी त्याचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. इंजिनिअरिंग प्रवेशासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'जेईई मेन्स' (जानेवारी २०२६) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात जळगाव येथील 'पेस आयआयटी आणि मेडिकल'च्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे.

संस्थेचा विद्यार्थी अथर्व चव्हाण याने 99.78% गुण मिळवून जळगाव, धुळे व परिसरातील जिल्ह्यांच्या शैक्षणिक इतिहासात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अथर्वच्या या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण खानदेशच्या शैक्षणिक वैभवात भर पडली आहे. अथर्वसोबतच संस्थेच्या इतर विद्यार्थ्यांनीही उत्तुंग भरारी घेतली आहे. यामध्ये प्रामुख्याने:

सारंग वाणी: ९८.२६ पर्सेंटाईल

आयुषी पाटील: ९७.४२ पर्सेंटाईल

भक्ती मकवाना: ९६.१५ पर्सेंटाईल

अनिकेत सिंग: ९३.०७ पर्सेंटाईल

या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या 'पेस' व 'जयिष्णू आयआयटी गुरुकुल'च्या संचालिका सौ. सविता वाणी, श्री. दिलीप वाणी व संपूर्ण टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. योग्य नियोजन, अचूक मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळेच हे यश साध्य करता आले, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, नीटची (NEET) तयारी करणाऱ्या आयुषी पाटील हिने केवळ भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातील उत्तम गतीमुळे जेईई परीक्षेतही घवघवीत यश मिळविले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीमध्ये 'इतक्या' दिवसांची वाढ, इराण युद्धाचा फटका भारताला
LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीमध्ये 'इतक्या' दिवसांची वाढ, इराण युद्धाचा फटका भारताला
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget