उन्हाचा चटका वाढला, जळगाव जिल्ह्यातील तळेगावात तीव्र पाणीटंचाई, महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील तळेगावामध्ये पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या 15 ते 25 दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प आहे.
Jalgaon News : राज्यात हळूहळू उन्हाचा चटका वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याचे दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील तळेगावामध्ये पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या 15 ते 25 दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प आहे. दोन पाणीपुरवठा योजना असूनही गावाला पाणी नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गावातील महिलांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. तसेच सर्व महिलांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.
गावातील महिलांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. तसेच पाईपलाईन दुरुस्ती करुन दोन दिवसांत पाणी सुरु करण्याचे आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाने दिले आहे.
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तळेगावात तीव्र पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे. गेल्या पंधरा ते पंचवीस दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प असून, गावाला दोन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आणि दोन्ही धरणे शंभर टक्के भरलेली असतानाही नळाला पाणी येत नसल्याने महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर गावातील महिलांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. मोर्चादरम्यान "पाणी असूनही पाणी नाही'' अशा घोषणा देत तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत पाईपलाईनमधील गळती दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. आश्वासनानंतर महिलांनी हंडा मोर्चा तात्पुरता स्थगित केला आहे.
मागील काही महिन्यांपासून अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा
अंबरनाथ पश्चिम भागातील नागरिकांना मागील काही महिन्यांपासून अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून याबाबत नवनिर्वाचित नगरसेवकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला हंडा-कळशी मोर्चाचा इशारा दिला आहे. तसेच आता निवेदन नाही तर अधिकाऱ्यांना दणका देऊ असा थेट इशारा माजी नगरसेवक मिलिंद पाटील यांनी दिला आहे.
अंबरनाथमध्ये पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करा अन्यथा हंडा मोर्चा
अंबरनाथ पश्चिम परिसरातील चिंचपाडा, नवरे पार्क, नारायणनगर, अण्णा पाटील नगर, आणि आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाने अनियमितपणे पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांना नियमितपणे २ तास पिण्याचे पाणी सोडण्यात यावे, दररोज व वेळेवर पाणी सोडले नाही तर परिसरातील नागरिकांसह नाविलाजास्तव मजीप्रा कार्यालयावर १३ फेब्रुवारी रोजी "हंडा - कळशी मोर्चा' काढण्यात येईल असा इशारा नगरसेवक कबीर गायकवाड, माजी नगरसेवक मिलिंद पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांना दिला आहे. येत्या १३ तारखेपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर, नागरिकांचा हंडा कळशी मोर्चा काढू. तसेच यापुढे निवेदन न देता अधिकाऱ्यांना दणका देऊ आणि कार्यालयाला टाळं ठोकू असा इशारा माजी नगरसेवक मिलिंद पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे.
























