Jalgaon News : जळगाव शहराजवळील गिरणा नदीपात्रात देवी विसर्जन करताना एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. हितेश संतोष पाटील (वय 19, रा. दादावाडी) असं वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बांभोरी गावाजवळ सुरत रेल्वे पुलानजीक घडली आहे. हितेश पाटील आपल्या मित्रांसह नदीत देवी विसर्जनासाठी गेला असताना विसर्जन केल्यानंतर त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला.
शोधकार्य सुरुच
मित्रांनी आरडाओरड करत घटनास्थळी मदत मागितली. परंतू, हितेश तोपर्यंत वाहून गेला होता. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्नीशमन दलासह महसूल विभाग, तालुका पोलीस ठाणे, वन्यजीव संरक्षण संस्था यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकातील सदस्यांनी संध्याकाळी सात वाजेपर्यंत शोध घेतला, मात्र हितेश सापडला नव्हता. शोधकार्य सुरुच आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्रात आठ पर्यटक बुडाले
सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. शिरोडा वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. यामध्ये तिघांचे मृतदेह सापडले आहेत, तर तिघांना वाचवण्यात यश आले आहे. इतर दोन पर्यटकांचा शोध सुरु आहे. बुडालेले सर्व पर्यटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या पर्यटकांचे शोधकार्य सुरु आहे.
तीन जणांना बाहेर काढण्यात यश, दोघांचा शोध सुरु
शिरोडा वेळागर येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांपैकी आठ जण शिरोडा समुद्रात बुडाले होते. त्यातील तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. उपचारासाठी त्यांना शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. घटनास्थळी बुडालेल्यांची शोध घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. काही पर्यटक कुडाळचे तर काही बेळगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मळगाव येथे वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मळगाव येथे आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर गंभीर जखमी झालं होतं. स्थानिकांनी वन विभागाला याची माहिती दिली आहे. मात्र, वन विभागाचे पथक दाखल होईपर्यंत सांबराचा मृत्यू झाला होता.बेसुमार जंगलतोड होत असल्याने वन्य प्राणी जंगलाच्या बाहेर पडत आहेत, त्यात महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू झाला.
महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! सिंधुदुर्गमध्ये आठ पर्यटक बुडाले, तीन जणांचा मृत्यू, बेपत्ता असलेल्या दोन जणांचा शोध सुरु