Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातूनएकअतिशयखळबळजनकबातमीसमोरआलीआहे. यात रात्रीच्या सुमारास आईच्या कुशीत झोपलेल्या दोन वर्षीय बालिकेस जंगली श्वापदाने पळून नेत ठार केल्याची घटना घडलीआहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून राजस्थान तसेच गुजरातमधील काठेवाडी गुरे चरण्यासाठी जळगाव जिल्ह्यात येत असतात. अशाच घटनेत चोपडा तालुक्यात शेत शिवारात हजारो गाईंचा कळप घेऊन गुराखी शेत शिवारात मुक्कामी आहेत. यावेळी ध्रुवी विपुल बरवाड ही दोन महिन्याची बालिका रात्रीच्या वेळेस आईच्या कुशीत झोपलेली असताना, अज्ञात जंगली प्राण्याने तिला उचलून नेत तिला ठार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याघटनेनंपरप्रांतीय गुराखीमध्येसध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Jalgaon News : अन्यथा अजूनही लहान बालकांचे बळी जाण्याची भीती

दरम्यान, वन विभागाने तातडीने या जंगली प्राण्याचा शोध लाऊन त्याला जेरबंद करावे, अन्यथा अजूनही लहान बालकांचे बळी जाण्याची भीती परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यानयाघटनेचीनोंदपोलिसांनीघेतलीअसूनया घटनेबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्रयाघटनेनंपरिसरातएकचखळबळउडालीआहे.

Jalgaon News : नागरिकांमध्ये संतापाचीलाट, तात्काळउपाययोजनाकरण्याचीमागणी

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मामलदे गावाच्या जंगलात अनेक हिंस्र प्राण्यांचंवास्तव्यआहे. त्यातीलचएखाद्या हिंस्र प्राण्यांनं दोन महिन्याची बालिकेला खाटेवरून उचलून नेल्याचाआणिहत्याकेल्याचाअंदाजआहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्यापुढीलतपाससुरु असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितलं. अलीकडच्याकाळातपरिसरातघडलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत बरेच जनावरे जखमी आणि मृत झाले आहे. सोबतच मनुष्यहानीची घटना घडतअसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होताना दिसून येत आहे.

Bhandara : खासगी ट्रॅव्हल्सची एसटी बसला धडक, 10 प्रवासी किरकोळ जखमी, मोठी जीवितहानी टळली

तुमसर इथून भंडाऱ्याकडे प्रवासी घेऊन निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसला गोंदियाच्या तिरोड्याकडून आलेल्या खाजगी ट्रॅव्हल्सनं पाठीमागून जबर धडक दिली. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी, बस आणि खासगी ट्रॅव्हल्समधील १० प्रवासी किरकोळ जखमी झालेत. ही घटना रामटेक - गोंदिया या राष्ट्रीय महामार्गावरील भंडाऱ्याच्या तुमसरच्या खापा चौकात घडली. एसटी महामंडळाची बस ही तुमसर आगाराची असून तुमसर येथून प्रवासी घेऊन भंडाऱ्याकडे निघाली होती. तर खासगी ट्रॅव्हल्स ही गोंदियाच्या तिरोडा येथून भंडाऱ्याकडे लग्न समारंभाच्या वऱ्हाड्यांना घेऊन निघाली होती. या अपघातात एसटी बसचा मागील भाग तर ट्रॅव्हल्सच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालं आहे.

 इतर महत्वाच्या बातम्या