मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर दोघांचा बलात्कार
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | 03 Jan 2017 06:17 PM (IST)
जळगाव : मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. भुसावळची तरुणी आपल्या मित्रासोबत जळगावातील यावल तालुक्यातल्या अकलूद शिवारात फिरायला गेली होती. आरोपी किरण कोळी आणि वासुदेव तायडे या दोघांनी पीडित तरुणी आणि तिच्या मित्राला मारहाण केली. त्यानंतर तरुणीचा मोबाईलही हिसकावून घेतला. अखेर बंदुकीचा धाक दाखवून या दोघांनी तरुणीवर बलात्कार केला. तरुणीच्या फिर्यादीवरुन दोघांचे रेखाचित्र बनवण्यात आलं आणि किरण कोळीला अटक करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत त्याने कबुली दिली असून, गुन्ह्यात वापरलेली बंदुक आणि तरुणीचा मोबाईल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आहे.