Jalgaon Farmers News : शेती काम करण्यासाठी मजुराला द्यावे लागणारे पाचशे रुपये आपल्या वडिलांकडे नाहीत, याची जाणीव असलेल्या भाग्यश्री सोनवणे या इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीने चक्क स्वतः बैल जोडीचा औत आपल्या हाती घेत वडिलांच्या खांद्याला खांदा लाऊन काम केल्याचं चित्र जळगाव जिल्ह्यातील नांदरा खुर्द गावात (Village of Nandra Khurd) पाहायला मिळाले आहे.
गेल्या काही वर्ष पासून शेतीसाठी लागणारे खते बियाणे आणि मजुरीमध्ये मोठी वाढ झाली असल्याने शेतीसाठी खर्च करणे परवडत नसल्याचं चित्र असताना, दुसरीकडे मात्र शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेती करणे मोठे अवघड झाले आहे. अशातच, दुष्काळात तेरावा महिना म्हणून यंदा अल निनोचा प्रभावमुळे, जळगाव (Jalgaon Farmers) जिल्ह्यात अनेक भागात अद्यापही पुरेसा पाऊस नसल्याचेचित्रआहे. परिणामीपेरण्या रखडल्या आहेत. तर ज्या ठिकाणी पेरण्या केल्या आहेत त्या ठिकाणी पेरणी केलेले पीक हाती येईल किंवा नाही याची शाश्वती नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेती खर्चात मोठी बचत करण्याचा प्रयत्न केला आहे.
Jalgaon Farmers News : वडिलांची आर्थिक परिस्थिती अन् मजूरमिळतनसल्यानेवडिलांच्याखांद्यालाखांदालावूनकाम
दुसरीकडे, सध्या शेतीसाठी मजूर मिळत नाही आणि मिळाले तरी पुरुष मजूर पाचशे रुपये मजुरी घेत असल्याने शेतकऱ्यांना ही मजुरी परवडत नाही, अशी परिस्थिती आहे. अशातच नांदरा खुर्द गावातील विनोद सोनावणे हा शेतकरी ही अशाच कोंडीत सापडला होता. मात्र भाग्यश्री सोनवणे या इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीने आपल्या वडिलांची आर्थिक परिस्थिती ही, मजुरांचे पाचशे रुपये रोज देण्याची ऐपत नसल्याचे लक्षात आल्यावर, माणसाची मजुरी वाचण्यासाठी भाग्यश्री सोनवणे हिने माणूस काम करत असलेला बैल जोडीचा औत आपल्या हाती घेतला. आणि वडिलांच्या खांद्याला खांदा लाऊन काम केल्याचे पाहायला मिळाले.
Jalgaon Farmers News : आई वडील आपल्यासाठी कष्ट करतात, ते आपल्याला पाहिले जात नसल्याने मदत
आपले आई वडील आपल्यासाठी कष्ट करतात, ते आपल्याला पाहिले जात नसल्याने रविवार सुटीच्या दिवशी आपण आपल्या आई वडिलांच्या मदतीला जाऊन काम करण्याचा निर्णय घेतल्याचे भाग्यश्री सांगत आहे. कष्टाचे काम असल्याने या कामामुळे आपले हात दुखत असले तरी वडिलांच्या मदतीला आल्याचा आनंद असल्याचं भाग्यश्री सांगते.
