Jalgaon Crime News : जळगावच्या निमखेडी (Jalgaon Nimkhedi) येथे कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिपाली नितीन सोनवणे असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिपाली सोनवणे या पती नितीन विजय सोनवणे हे आपली दोन मुलं व एक मुलगी यांच्यासोबत निमखेडी गावात राहत होत्या. हातमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या नितीन सोनवणे यांचे पत्नीशी काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. जळगाव जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर नातेवाईकांची एकच गर्दी केली आहे.
लोखंडी विळ्याने पत्नीच्या मानेवर व पोटावर वार करून तिची हत्या केली
आज दुपारी पुन्हा वाद उफाळून आल्यानंतर संतापाच्या भरात त्यांनी लोखंडी विळ्याने पत्नीच्या मानेवर व पोटावर वार करून तिची हत्या केली. खून केल्यानंतर आरोपी नितीन सोनवणे हा स्वतःहून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या झाल्याची माहिती मिळत आहे. लोखंडी विळ्याने पोटावर व मानेवर वार करून पत्नीचा निर्घृण खून केला आहे. जळगावच्या निमखेडीत ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिपाली सोनवणे या पती नितीन विजय सोनवणे हे आपली दोन मुलं व एक मुलगी यांच्यासोबत निमखेडी गावात राहत होत्या.
इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 19 वा दिवस आहे. युद्ध अधिक भडकताना दिसत आहे. इराण आता अधिक घातक झाला असून जिकडे वाट्टेल तिकडे हल्ले करत आहे. आखाती देशांवरील हल्ले इराणकडून वाढली आहेत. अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम अख्ख्या जगावर होत आहे. इराणकडून महत्वाचा होर्मुज मार्गही बंद करण्यात आला. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देश संकटात आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्ग काढण्याची मागणी केली जात आहे. शिवाय जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. जगात या युद्धामुळे हाहाकार माजला आहे. पश्चिम आशिया किंवा मध्य पूर्व, हे एक पूर्णपणे रणांगण बनले आहे. हे युद्ध जरी थेट इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात लढले जात असले तरीही त्याच्या झळा सर्वांनाच बसत आहेत. पर्शियन आखातातील इराणच्या दक्षिण पार्स गॅस क्षेत्र आणि संबंधित पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यानंतर इराण अमेरिका-इस्रायलच्या मित्र राष्ट्रांवर सूड घेत आहे. इराणने कतारच्या ऊर्जा सुविधांना वारंवार टार्गेट केले. बुधवारी संध्याकाळी
वसईच्या जीवन नगर रोड इथं दोन महिलांवर केला अत्याचार
वसईच्या जीवन नगर रोड, गोराई नाका हवई पाडा परिसरात दोन महिलांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिलांवर हल्ला होत असल्याचे दिसत असून, फावड्याने आणि लाकडी दांडक्याने मारहाण होत असल्याचं दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
मी बायकोला मारुन आलोय, पत्नीची हत्या करुन पती पोलिस स्टेशनमध्ये हजर, पोलिसांकडून आरोपीला अटक