Jalgaon Crime News :जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचारझाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसांनी (Police) तीन जणांविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी फरार आहे. मे ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत तसेच संशयित आरोपींनी  फोटो काढून ते व्हायरल करण्याच्या धमक्या देत पीडितेवर अत्याचार केल्याची माहिती फिर्यादीत नमूद केली आहे. दरम्यान, या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.

अटक झालेल्या आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्यानंतर पीडितेने पालकांकडे हा प्रकार सांगितला होता. त्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. अटक झालेल्या आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून तिसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळं पाचोऱ्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार आहे. फरार झालेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्यानंतर परिसरातील नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करावी अ,ी मागणी केली आहे. 

बदलापुरातील चार वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरण! नीलम गोऱ्हे  बदलापूर पोलीस ठाण्यात दाखल 

बदलापुरात देखील चार वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे  बदलापूर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.  परिमंडळ चारचे पोलीस उपयुक्त सचिन गोरे यांची त्या भेट घेणार आहेत. चार वर्षीय चिमुकलीवर शाळेतून घरी परतताना व्हॅन चालकाने लैंगिक अत्याचार केल्याने बदलापूर पुन्हा हादरलं आहे. अक्षय शिंदे प्रकरणाच्या आठवणी ताज्या असताना बदलापुरात पुन्हा लहान मुलीला लक्ष करण्यात आल्याने बदलापूर हादरलं आहे. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर ज्या स्कूल व्हॅन मध्ये अत्याचार करण्यात आला होता त्या व्हॅनवर कल्याण आर टी ओ ने कारवाई देखील केल्याची माहिती मिळाली आहे.  त्या व्हॅनला कुठलीही परवानगी नसल्याचे उघड झाले आहे. व्हॅनचा परवाना रद्द करुन त्या व्हॅनला 24 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Nanded Crime : गुंगीचे औषध दिलं, लैंगिक अत्याचार केला, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार संबंध अन् गर्भपात...शिक्षकाच्या कृत्याने नांदेड हादरलं