Jalgaon Bus Accident : जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात (Jalgaon Bus Accident ) झाल्याची घटना घडली आहे.  जळगाव कडून भुसावळकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. अंमळनेर आगाराची ही बस भुसावळकडे जात असताना टायर फुटल्याने बस टोल नाक्याच्या भिंतीवर आदळली. बसचे टायर फुटून टोल नाक्याच्या भिंतीवर बस आढळल्याने एक प्रवासी महिला चाकाखाली येऊन जागीच ठार झाली आहे. नशिराबाद टोलनाक्याजवळ ही घटना घडली आहे.  

Continues below advertisement

अपघाताच्या धक्क्याने बसमध्ये बसलेली महिला प्रवासी खिडकीतून बाहेर फेकली गेली

बसच्या मागील चाकात प्रवासी महिला येऊन जागीच मृत्यू झाल्याने परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. जळगाव शहरापासून जवळ असलेल्या नशिराबाद टोलनाक्याजवळ बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक प्रवासी महिला जागीच ठार झाली आहे. अंमळनेर आगाराची बस जळगावकडून भुसावळ कडे जात असताना वेगात असलेल्या बसचे चाक फुटल्याने बस चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरकटलेली बस थेट टोल नाक्या जवळील एका भिंतीवर जाऊन आदळली. या अपघाताच्या धक्क्याने बसमध्ये बसलेली महिला प्रवासी खिडकीतून बाहेर फेकली गेली. दुर्दैवाने ती महिला बसच्या मागील चाकाखाली आली आणि चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाल

घटनास्थळी स्थानिक लोकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील त्वरित घटनास्थळी दाखल झाले. तेथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने कारवाई केली आहे. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Bhiwandi News : भिवंडीत अतिधोकादायक इमारत कोसळली, किराणा दुकानासह दुकानदार ढिगाऱ्याखाली अडकला, दैव बलवत्तर म्हणून...