एक्स्प्लोर

Jal Jeevan Mission : धक्कादायक! जलजीवन मिशनची पोलखोल, सरकारकडे तब्बल 35 हजार कोटींची थकबाकी, कंत्राटदार अडचणीत

Jal Jeevan Mission : जलजीवन मिशनच्या कामाची तब्बल 35 हजार 622 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे.

Jal Jeevan Mission : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील रहिवासी आणि कंत्राटदार हर्षल पाटील (Harshal Patil) यांच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशनअंतर्गत गावांमध्ये पाणीपुरवठ्याचं काम पूर्ण केलं होतं. मात्र, शासनाकडून कामाचे पैसे न मिळाल्यामुळे आणि त्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या मानसिक त्रासामुळे त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर सरकारवर जोरदार टीका होत आहे. सरकारकडून वेळेत बिल मिळत नसल्याने आत्महत्या केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केला आहे. तर सरकारने वेळेत पैसे न दिलेले आरोप महायुतीच्या मंत्र्यांनी फेटाळले आहेत. मात्र आता जलजीवन मिशनच्या कामाची तब्बल 35 हजार 622 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांनंतर जलजीवन मिशनची काम करणाऱ्या कंत्राटदारांपुढे मोठं संकट असल्याचे दिसून येत आहे.  

जलजीवन मिशनच्या कामाची तब्बल 35 हजार 622 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. केंद्राकडून तब्बल 19 हजार 259 कोटी रुपये येणे बाकी आहे.  तर राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून 16 हजार 363  कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे.  

35 हजार कोटी रुपये थकले

केंद्र आणि राज्यातील एकूण 35 हजार कोटी रुपये जलजीवन मिशनचे थकलेत आहेत. मागील वर्षी ऑक्टोबर 2024 पासून केंद्राचा एकही रुपया जलजीवन मिशनचा राज्याला आलेला नाही. जलजीवन मिशनसाठी राज्याचा 35 हजार कोटी रुपयांचा आराखडा आहे. 2024 मध्ये जलजीवन मिशनसाठी केंद्राकडून पाच हजार कोटी तरतूद केली होती. मात्र, त्यापैकी फक्त 1600 कोटी रुपये देण्यात आले आहेत. 

पैसे कधी वर्ग होणार? कंत्राटदारांचे लक्ष

16 जूनला केंद्राने प्रत्येक राज्याला पत्र लिहून जलजीवन मिशनसाठी सध्या राज्य सरकारने तरतूद करावी, असं म्हटलं आहे. इतर राज्यांमध्ये राज्याने जलजीवन मिशनसाठी पैसे वर्ग केलेत. मात्र, महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेमुळे हे पैसे वर्ग करण्यात आलेले नाहीत. पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशनसाठी 3900 कोटी रुपये मिळावेत, असे पत्र वित्त विभागाला पाठवले आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती समोर आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून पैसे कधी वर्ग होणार? याकडे कंत्राटदारांचे लक्ष लागले आहे. 

राज्यात एकूण 52 हजार कोटी रुपयांची कामे 

जलजीवन मिशनची राज्यात एकूण 52 हजार कोटी रुपयांची कामे होती. त्यापैकी 25 हजार 600 कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. म्हणजेच जवळपास 50 टक्के कामे अजूनही अपूर्ण आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून पैसे नसल्यामुळे अनेक कामे अर्धवट बंद पडलेली आहेत. केंद्र सरकारने सुरू केलेल्या जलजीवन मिशन योजनेची मुदत मार्च 2025 रोजी संपलेली आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची मुदत 2028 पर्यंत वाढवण्यात आलीय. मात्र, अद्यापही यावरती निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे केंद्राचे पैसे थकीत आहेत. 

आणखी वाचा 

Harshal Patil Case: जबाबदारी झटकत गुलाबराव पाटलांनी आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं; हर्षल पाटील कुटुबीयांचा संताप

महत्त्वाच्या बातम्या

UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
अवास्तव मागण्या पूर्ण कशा होणार? मुख्यमंत्र्यांना शिव्या देऊन मार्ग निघणार नाही, जरांगे पाटलांच्या उपोषणासंदर्भात नेमकं काय म्हणाले महाजन? 
अवास्तव मागण्या पूर्ण कशा होणार? मुख्यमंत्र्यांना शिव्या देऊन मार्ग निघणार नाही, जरांगे पाटलांच्या उपोषणासंदर्भात नेमकं काय म्हणाले महाजन? 
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा

व्हिडीओ

MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
Embed widget