Dada Bhuse : राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे राष्ट्रगीता पाठोपाठ राज्यगीत होणं  अनिवार्य असल्याचे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलं. अनेक शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यापुढं राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीता पाठोपाठ राज्यगीत लावणं सक्तीचं असल्याचे भुसे म्हणाले. मराठी भाषा प्रत्येक शाळात शिकवणं सक्तीचं असल्याचे भुसे म्हणाले. 


शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत लोकप्रतिनिधी अधिकारी सचिव करणार आहेत. 21 व्या शतकात ई माध्यमाचा विषयही आम्ही प्रभावीपणे राबवणार आहोत. 
पुढील वर्षापासून शालेय शिक्षणात सीबीएससी बोर्डातील काही निवडक चांगल्यबाबींचा शिक्षणात समावेश केला जाणार असल्याचे भुसे म्हणाले. याबाबतचं नियोजन हे पूर्ण झालेलं आहे. तत्पूर्वी शिक्षकांना त्याची ट्रेनिंग या चालू वर्षात दिली जाईल असे भुसे म्हणाले. पुढील वर्षापासून शालेय शिक्षणात सीबीएससी बोर्डातील निवडक अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होईल असे भुसे म्हणाले. 


संजय राऊतांनी स्वत:च्या तोंडाला आवर घालावा


संजय राऊतांनी स्वत:च्या तोंडाला आवर किंवा लगाम घातला तर कोण समोरुनही बोलणार नाही. त्यांची दररोजची प्रतिक्रिया पाहता त्यांना अशा गोष्टींनी सामोरे जावे लागते. राहिला विषय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी माणसांचे हिंदुंचे दैवत आहेत त्यांच्यावर सर्वांच अधिकार आहे एका कुटुंब एका व्यक्तीचा अधिकार नाही. कदाचित रक्ताचं नात म्हणून ते वारसदार असतील मात्र विचारांचे वारसदार राज्यातील नागरिक लाखो करोडो शिवसैनिक आहेत असे भुसे म्हणाले. स्मारकावर आता अध्यक्ष कोण आहेत याची मला सविस्तर माहिती नाही माहिती घेऊन बोलेण असेही भुसे म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


ZP School : जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI