Iran-US War Impact on India : मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे आणि आता भारतावरही त्याचा परिणाम होऊ शकतो, अशीसंभाव्यभीतीलक्ष्यातघेतापंतप्रधाननरेंद्रमोदींनी (Narendra Modi) देशवासियांनाकाहीमहत्वपूर्णआवाहनकेलंआहे. दुसरीकडेपंतप्रधानांच्याआवाहनानंतरअनेकप्रतिक्रियासमोरयेतआहे. अशातच आशियाई विकास बँकेने (ADB) देखीलयासंदर्भात इशारा दिला आहे. मध्य पूर्वेतील सध्याच्या संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमती दीर्घकाळ वाढलेल्या राहू शकतात. यामुळे भारतात महागाई वाढू शकते आणि आर्थिक विकासावर परिणाम होऊ शकतो. असाअंदाजव्यक्तकरण्यातआलाआहे.
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर भारतात सराफा व्यवसायावर मोठा परिणाम होइल, अशी शंका ज्वेलरी व्यावसायिकांची देशातील सर्वांत मोठी संघटना असलेली ॲाल इंडिया जेम ॲप ज्वेलरी कौन्सिलने व्यक्त केली आहे. भारतात सोनं म्हणजे धार्मिक संस्कृती आणि त्याला स्वतःचअसं वेगळे महत्व आहे. लोकांना सोनं खरेदी बंद केलं, तर एक कोटी लोकांच्या रोजगारावर परिणाम होईल. मात्र, राष्ट्रहित लक्षात घेऊन पंतप्रधानांचं आवाहन त्याला आमचे समर्थन आहे. पण लोकांनी सोनं खरेदी न करणे कठीण आहे.
Rajesh Rokade : देशात दरवर्षी 700 टन सोन्याची आयात, कारागीरांना सर्वाधिक फटका
ज्वेलरी उद्योगाचं जीडीपीमध्ये सात टक्के योगदान आहे. महाराष्ट्र आणि पश्मिम बंगाल येथील कारागीरांना याचा सर्वाधिक फटका बसेल. देशात दरवर्षी 700 टन सोन्याची आयात होते. यात भारतात Gold Monitisation Schemae इम्प्लिमेंट करावी. युक्रेन रशिया वॉर दरम्यान युक्रेनच्या नागरिकांनी सोने विक्री करून स्वतःला उभारले असेही ॲाल इंडिया जेम ॲप ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सीलचे अध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले.
कच्च्या तेलाच्या किमती उच्च राहण्याची शक्यता
पीटीआयच्या वृत्तानुसार, एडीबीचे मुख्य अर्थतज्ज्ञ अल्बर्ट पार्क यांनी म्हटले आहे की, जर मध्य-पूर्वेतील संकट दीर्घकाळ टिकले, तर त्याचा पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होईल आणि त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊ शकते. त्यांच्या अंदाजानुसार, 2026 मध्ये कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 96 डॉलरपर्यंत पोहोचू शकते, तर 2027 मध्ये ती प्रति बॅरल सुमारे 80 डॉलर राहू शकते.
Iran-US War Impact on India: भारताच्या जीडीपी वाढीवर परिणाम होईल
अल्बर्ट पार्क म्हणाले की, या संकटाचा भारताच्या आर्थिक विकास दरावरही परिणाम होईल. एडीबीच्या अंदाजानुसार, भारताची जीडीपी वाढ 0.6 टक्क्यांनी घसरून 6.3 टक्क्यांवर येऊ शकते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, एप्रिलमध्ये एडीबीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताची जीडीपी वाढ 6.9 टक्के राहील असा अंदाज वर्तवला होता, तर पुढील आर्थिक वर्षात ती 7.3 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा होती. किंबहुना, दिलासादायक बाब ही आहे की भारतीय अर्थव्यवस्था पुढील वर्षी पुन्हा रुळावर येऊ शकते.
महागाई वाढू शकते का?
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम केवळ जीडीपीपुरता मर्यादित राहणार नाही. भारतातील महागाईही वाढू शकते. एडीबीचा (ADB) चालू आर्थिक वर्षासाठीचा सुरुवातीचा महागाईचा अंदाज 4.5 टक्के होता, जो आता वाढवून 6.9 टक्के करण्यात आला आहे. याचा अर्थ महागाई 2.4 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
महागाई का वाढेल?
भारत आपल्या तेल आणि वायूच्या गरजांचा मोठा भाग परदेशातून आयात करतो. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय बाजारात तेल आणि वायूच्या किमती वाढल्यास त्याचा थेट परिणाम भारतावर होतो. शिवाय, वाढत्या वायूच्या किमतींमुळे खते आणि खतांच्या किमती वाढतील, ज्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढेल. शेतकऱ्यांनी खतांचा वापर कमी केल्यास, पीक उत्पादन घटू शकते. याचा थेट परिणाम अन्नधान्याच्या किमतींवर होईल. स्पष्टपणे, मध्य पूर्वेतील दीर्घकाळ चाललेल्या तणावाचा थेट परिणाम भारतातील महागाईवर होईल, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशावर ताण येईल.
हे सुद्धा वाचा:
