Sadanand Date:महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदासाठी (DGP) एनआयएचेमहासंचालक सदानंद दाते (Sadanand Date) यांचे नाव आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने (Central Government) सदानंद दाते यांना एनआयए (NIA) प्रमुख पदावरून कार्यमुक्त केले असून, राज्य सरकारनेही त्यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे.
सध्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या 31 डिसेंबर 2025 रोजी निवृत्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने सात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) पाठवली होती, त्यामध्ये सदानंद दाते यांचे नाव प्रमुख्याने चर्चेत आहे.
Sadanand Date:UPSC पॅनेलनंतरDGP निवड
UPSC कडून तीन सदस्यीयअधिकाऱ्यांच्यापॅनेलची निवड केल्यानंतर राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकाची अंतिम निवड केली जाणार आहे. या पदावर सदानंद दाते यांची निवड झाल्यास, ते 31 डिसेंबर रोजी रश्मी शुक्ला यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. IPS सदानंद दातेंचा कार्यकाळ डिसेंबर 2026 पर्यंत असणार आहे.
Sadanand Date:कोण आहेत सदानंद दाते?
14 डिसेंबर 1966 रोजी पुण्यात जन्मलेले सदानंद दाते हे 1990 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते कडक शिस्त, निर्भीड निर्णय आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जातात. आता पर्यंत त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, सायबर क्राईम, रेल्वे पोलिस, एसपीनवी मुंबई, मिराभाईदरपोलिस आयुक्त, दहशतवाद विरोधी पथक प्रमुख, अशा विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्यायशस्वीरीत्या सांभाळल्या आहेत. 31 मार्च 2024 रोजी त्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) च्या महासंचालकपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘ब्लॅक कॅट’ कमांडोनी अनेक संवेदनशील आणि महत्त्वाची ऑपरेशन्स यशस्वी केली.
Sadanand Date:26/11 हल्ल्यात महत्त्वाची भूमिका
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात सदानंद दाते यांची भूमिका ऐतिहासिक ठरली होती. तेव्हा ते मुंबईक्राईमब्रँचमध्ये कार्यरत होते. कामा रुग्णालयात दोन दहशतवादी घुसल्यानंतर, दाते यांनी काही पोलिसांसह त्यांचा सामना केला. त्यांच्या धाडसामुळे अनेक ओलिसांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. दहशतवाद्यांना रोखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या चकमकीत सदानंद दाते गंभीर जखमी झाले होते, तरीही त्यांनी आपले कर्तव्य बजावले.
Sadanand Date:दहशतवादविरोधी तपासात ठसा
एनआयए प्रमुख म्हणून दाते यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास, फरीदाबाद डॉक्टर दहशतवादी मॉड्युल प्रकरण, 26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला भारतात आणण्यासाठीची प्रक्रिया, या सर्व प्रकरणांमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.
Sadanand Date:महाराष्ट्राच्या सुरक्षेचीसूत्रेदातेंकडे?
सदानंद दाते यांची पोलीस प्रशासनातील प्रदीर्घ अनुभवसंपन्न कारकीर्द, दहशतवादविरोधी लढ्यातील योगदान आणि केंद्र–राज्य पातळीवरील विश्वास पाहता, महाराष्ट्राच्या पुढील पोलीस महासंचालकपदासाठी त्यांचे नाव सर्वाधिक मजबूत मानले जात आहे. त्यामुळे आता सदानंद दाते यांच्यावरमहाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी सोपवली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
