Rashmi Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (UBT) मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. माजी मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने 10 पैकी 10 सिनेटच्या जागा जिंकल्य. सिनेटच्या निवडणुका या ना त्या कारणाने दोनदा रद्द झाल्या. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने सिनेट निवडणुकीतील मतमोजणीला स्थगिती देण्यास नकार दिला होता.



मातोश्रीच्या प्रांगणात जल्लोष, रश्मी ठाकरे थेट गॅलरीत 


दरम्यान, सिनेट निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आज मातोश्रीवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी जोरदार गुलालाची उधळण करण्यतात आली. आदित्य ठाकरे तसेच तेजस ठाकरे यांना खांद्यावर घेत जल्लोष करण्यात आला. यावेळी जल्लोष पाहण्यासाठी रश्मी ठाकरे सुद्धा गॅलरीत पोहोचल्या. यावेळी आदित्य यांनी रश्मी यांची गळाभेट घेत आनंद व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीला काही दिवसांचा अवधी बाकी असल्याने या विजयाने मुंबईत ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.


2018 च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील अविभाजित शिवसेनेकडून युवासेनेने 10 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या. ठाकरे गटाच्या युवा सेनेने ही निवडणूक काबीज केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात होत्या. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अभाविपने लढवली होती. सिनेट निवडणुकीत एकूण 55 टक्के मतदान झाले. सिनेटच्या 10 जागांपैकी पाच जागा राखीव आहेत. उर्वरित पाच जागा खुल्या आहेत. सिनेट निवडणुकीत एकूण 28 उमेदवार रिंगणात होते.


सिनेट कोण बनले?


मुंबई विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातून ओबीसी प्रवर्गातील युवासेनेचे उमेदवार मयूर पांचाळ विजयी झाले आहेत. प्रथम मयूर पांचाळ यांचा निकाल लागला. त्यांना सुमारे 5350 मते मिळाली. त्यांनी अभाविपचे उमेदवार राकेश भुजबळ यांचा पराभव केला. भुजबळांना केवळ 888 मतांवर समाधान मानावे लागले. महिला गटात युवासेनेच्या स्नेहा गवळी यांनी अभाविपच्या रेणुका ठाकूर यांचा 5914मते मिळवून पराभव केला. एससी प्रवर्गातून युवा सेनेच्या शीतलशेठ देवरुखकर विजयी झाल्या आहेत. एसटी प्रवर्गातून युवा सेनेचे धनराज कोछडे विजयी झाले आहेत. त्यांना 5247 मते मिळाली. त्यांनी अभाविपच्या निशा सावरा यांचा पराभव केला आहे. याशिवाय एनटी आणि खुल्या गटात अनुक्रमे युवासेनेचे शशिकांत ढोर, प्रदीप सावंत, मिलिंद साठम आणि परम यादव यांनी बाजी मारली आहे. या निवडणुकांसाठी 22 सप्टेंबर रोजी मतदान झाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या