Beed Nagarpanchayat Election : निवडणुकीमध्ये विरोधक काय आरोप करतील याचा काही नेम नाही.. अनेकदा उमेदवार एकमेंकावर वैयक्तीक टीका देखील करत असतात. बीड जिल्ह्याच्या आष्टीमध्येही असंच काही झालं. बीडच्या नगरपंचायत निवडणुकांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी उमेदवार आयशा बेग यांचा प्रचार करणारे त्यांचे पुत्र जिया बेग यांच्या वजनावरुन त्यांच्यावर टीका केली होती. पण याच जिया बेग यांनी प्रचार केल्यानंतर त्यांच्या आई आयशा विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी वजनदार जिया बेग यांना थेट खांद्यावर घेत जल्लोष केला आहे.


नगरपंचायत निवडणूकांआधी प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी विरोधी उमेदवारांवर टीका करताना आयशा बेग यांचा मुलगा जिया बेगच्या वजनावर टीक केली होती, ते म्हणाले होते, 'आमच्याकडे दीडशे किलोचा कोणीही उमेदवार नाही.' पण जिया बेग यांच्या आई आयशा बेग या आष्टी नगरपंचायत निवडणुकीत सर्वाधिक मत घेऊन विजयी झालेल्या उमेदवार ठरल्या आणि मग काय बेग यांच्या कार्यकर्तायंनी नुसता जल्लोष करत जिया यांना थेट खांद्यावर घेत धिंगाणा केला. 


पाहा व्हिडीओ



कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष


या विजयानंतर बेग यांच्या समर्थकांनी तुफान जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी दीडशे किलो वजन अशी टीका झालेल्या जीया बेग यांना थेट डोक्यावर आणि खांद्यावर घेत नाचले. ज्यानंतर या संपूर्ण विजयाचे शिल्पकार सुरेश धस यांच्या घरी कार्यकर्ते जमा झाले. कार्यकर्त्यांनी अगदी नाचत जीया बेग यांना सुरेश धस यांच्या घरी आणलं. बाळासाहेब आजबे यांनी दीडशे किलो उमेदवार म्हणून टीका केली तरी मी त्याहून जास्त मतांनी आम्ही विजयी झालो अशी प्रतिक्रिया विजयानंतर जिया यांनी दिली.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha