Vijay Wadettiwar : राज्यातील शेतकरी संकटात असल्याचं चित्र दिसत आहे. एका बाजूला अतिवृष्टी आणि दुसऱ्या बाजूला पिकांवर पडणारी रोगराई. यामुळं राज्यातील शेतकऱ्यांच्या (farmers) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं नष्ठ झाली आहेत. याच मुद्यावरुन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शासनाच्या नाकर्तेपणामुळेच शेतकऱ्यांवर संकट आलं आहे. शेतकऱ्यांना तातडीने पंजाबच्या धर्तीवर 50 हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणी आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली.
सोयाबीन पिकावर येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बेलोना गावातील सुरेश शेंडे या शेतकऱ्याचे सहा एकर वरील सोयाबीनचे पीक मातीमोल या रोगाने मातीमोल झाले. या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली. यावेळी सोयाबीन पिकावर येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे स्पष्ट दिसून आले. या रोगामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सुमारे 80 टक्के शेंगांमध्ये दाणे तयारच झालेले नाहीत, तर उरलेला दाणा अत्यंत बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांना काढणीचा खर्चही परवडणारा नाही, अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
विजय वडेट्टीवर यांचं कृषीमंत्री भरणेंना पत्र, शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी
एकीकडे अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीने शेतकरी उभा आडवा झाला आहे आणि दुसरीकडे शासन त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. पंजाबच्या धर्तीवर शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 50 हजार रुपये तात्काळ मदत देणे आवश्यक आहे. अन्यथा शेतकरी पूर्णतः उध्वस्त होतील. तसेच कृषिमंत्री दत्ता भरणे यांना देखील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी पत्र लिहून या रोगाची पाहणी करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची वडेट्टीवार यांनी मागणी केली आहे.
सध्या राज्यातील शेतकरी अडचणीत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागातमुसळधार पाऊस कोसळत आहे.यामुळं अनेक ठिकाणी जनजीव विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत. जमिनींचं नुकसान झालं आहे. अशातच शेतकऱ्यांच्या पिकांवर विविध प्रकारच्या रोगराईसुद्धा येत आहेत. त्यांमुळं राज्यातील शेतकरी संकटात असून, सरकारनं मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या: