मुंबई : आधीच पुराने हैराण झालेल्या मराठवाड्यासमोरील संकट आता अधिक गडद होण्याची शक्यता आहे. पुढचे पाच दिवस म्हणजे, 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या दरम्यान राज्यासह मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा (Marathwada Rain) देण्यात आला आहे. तर 27 सप्टेंबर रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांसाठी (Marathwada Flood) सुरू असलेल्या मदतकार्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. सोबतच, चक्रीय स्थिती असल्याने राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील 5 दिवसांत, म्हणजे 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या दरम्यान राज्यातील सर्वच भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यापैकी मराठवाड्यात 27 सप्टेंबर रोजी काही भागात पावसाची तीव्रता अधिक असणार आहे.
IMD On Marathwada Rain : विदर्भ मराठवाड्यात अतिमुसळधार
विदर्भातील काही भागात 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही भागात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही भागात 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर अधिक असणार आहे.
राज्यभर असलेल्या पावसाची शक्यता लक्षात घेता मच्छिमारांना 25 ते 29 सप्टेंबर दरम्यान समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
Marathwada Rain Update : मराठवाडा पावसात बुडाला
दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं ओलाचिंब झाला आहे. इतका इतका पाऊस झाला की मराठवाड्याच्या नाकातोंडात पाणी गेलं आहे. आणि जनजीवन ठप्प झालं.
धाराशीव, बीड, जालन्यात पावसाचं थैमान पाहायला मिळालं. ज्या मराठवाड्याला दुष्काळात रेल्वेनं पाणी पोहोचवावं लागलं होतं, तिकडे आता हेलिकॉप्टरमधून लोकांचं रेस्क्यू करण्याची वेळ आली आहे.
मराठवाड्यात 1 जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या 124 टक्के पाऊस पडला आहे. 22 सप्टेंबरपर्यंत सरासरी 604 मिमी पाऊस होत असतो. मात्र आता 747 मिमी इतका सरासरी पाऊस मराठवाड्यात झाला आहे. फक्त सप्टेंबरचा विचार करायचा 165 टक्के पाऊस मराठवाड्यात झाला आहे.
पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना 2 हजार 215 कोटींची मदत केल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली.
ही बातमी वाचा: