Supriya Sule Slams Central government : नुकतंच देशात पाच महत्त्वाच्या राज्यांतील निवडणूक पार पडली. गोवा, पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांत पार पडलेल्या निवडणुकीत पंजाब वगळता इतर चारही राज्यात भाजपने दमदार कामगिरी केली. दरम्यान आता निवडणूकीच्या निकालानंतर अवघ्या काही दिवसांत महागाई पुन्हा वाढू लागल्याचं दिसत आहे. गॅसचे दर 50 रुपयांनी वाढले असून पेट्रोलच्या दरातही वाढ होत आहे. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत सरकारला झापलं आहे. केंद्र सरकार निवडणूकीत व्यस्त असल्यावर महागाई वाढत नाही. असं असेल तर दर महिन्याला निवडणूक ठेवा असा खोचक टोलाही सुळेंनी यावेळी दिला आहे.
आज लोकसभेत बोलत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा मुद्दा मांडला. यावेळी त्या म्हणाल्या, 'केंद्रसरकारला पाच राज्यातील जनतेने बहुमत देऊन विजयी केले. पण निवडणूका संपताच केंद्रसरकारने पेट्रोल,डिझेल आणि गॅसची दरवाढ केली. महागाईचा कहर असतानाच ही दरवाढ लादण्यात आली आहे.''
'मग दर महिन्यालाच निवडणूक घ्या'
जेव्हा निवडणूका असतात तेव्हा केंद्रसरकार गॅस, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करत नाही. आपण दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे केंद्रसरकार तिकडे व्यस्त राहिल परिणामी गॅस, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत. अशी खोचक टीकाही यावेळी सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत बोलताना केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Ajit Pawar : सदाभाऊंचा रापलेला चेहरा निखरलाय, लाड सासरेबुवा झालेत, दादांच्या भाषणासमोर शालजोडे फिके
- Girish Mahajan : फडणवीसांनी दाखवलेल्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणी प्रवीण चव्हाण यांच्या अडचणीत वाढ, गिरीश महाजनांची पोलीस ठाण्यात तक्रार
- Sharad Pawar On ED : मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर ईडीच्या कारवाईबाबत शरद पवार म्हणतात, "ED गावागावात पोहचलीय"
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha