ABP Majha Exclusive, Nitin Gadkari On Potholes : राष्ट्रीय महामार्गावरच्या (National Highway) खड्ड्यांबाबत (Pothole News) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रीय महामार्गावर कुठेही खड्डे दिसले तरी ते तीन दिवसांत बुजवले जातील, अशी घोषणा नितीन गडकरी (Nitin Gadkari On Potholes) यांनी एबीपी माझाला (ABP Majha Exclusive) दिलेल्या मुलाखतीत केलीय. त्यासाठी नवं अॅप तयार करणार असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली. एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी नितीन गडकरी यांची एक्स्ल्युझिव्ह मुलाखती घेतली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर महत्त्वाची माहिती दिली. 


राष्ट्रीय महामार्गावर खड्डे दाखवा, 3 दिवसांत सुधरवू : नितीन गडकरी 


एबीपी माझाला दिलेल्या एक्स्ल्युझिव्ह मुलाखतीत बोलताना केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली. राष्ट्रीय महामार्गांवरील खड्डे दाखवा. केवळ 3 दिवसांत सुधरवू, असं आश्वासन यावेळी नितीन गडकरी यांनी दिलं आहे. तसेच, पुढे बोलताना त्यांनी टोल बूथजवळ राहणाऱ्यांसाठीही मोठी घोषणा केली. रोज कामाला जाणाऱ्यांना टोल लागू नये, यासाठी नवीन पॉलिसी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. खास म्हणजे, जे टोल बुथच्या एका बाजूला राहतात आणि त्यांना टोल क्रॉस करून दुसऱ्या बाजूला जावं लागतं, त्यांना या पॉलिसीत मोठी सूट देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  


पाहा व्हिडीओ : राष्ट्रीय महामार्गावर कुठेही खड्डे दिसले तरी ते तीन दिवसांत बुजवले जातील



कारमध्ये पाठीमागे बसणाऱ्यांनी सीट बेल्ट लावला नाही, तर सायरन वाजणार : नितीन गडकरी 


कारमध्ये पाठीमागे बसणाऱ्यांनी सीट बेल्ट लावला नाही, तर सायरन वाजणार असल्याचंही नितीन गडकरींनी यावेळी बोलताना सांगितलं. यासंदर्भात बोलताना नितीन गडकरी बोलताना म्हणाले की, "कारमधून प्रवास करताना आता मागच्या प्रवाशांनाही सीट बेल्ट लावावा लागणार आहे. कारण मागच्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावला नाही तर सायरन वाजणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ही माहिती दिली आहे. सील बेल्टसाठी कारमध्ये आता नवी पद्धत लागू करण्यात येणार आहे. 


एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत नितीन गडकरी यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. तसेच, सध्या राजकीय वर्तुळात सुरु असणाऱ्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं. गडकरींनी कार कंपन्यांना देखील प्रश्न विचारले आहेत. ते म्हणाले की,  इकॉनॉमिक मॉडेल निर्यात करायचं असेल तर त्याला 6 एअर बॅग्स देता, पण भारतात इकॉनॉमिक मॉडेल देताना मात्र केवळ दोनच एअर बॅग दिल्या जातात, असं का? यासंदर्भातही चर्चा सुरू असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं. तसेच यासंदर्भातही लवकरत निर्णय घेतला जाईल, असंही सांगितलं. काही दिवसांपूर्वी बोलताना नितीन गडकरींनी हवेत उडणाऱ्या बससंदर्भात घोषणा केली होती. त्याबाबत विचारलं असता, बंगळुरूतील एका कंपनीशी बोलणं सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. 


नाना पटोलेंच्या आमंत्रणाबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले... 


काही दिवसांपूर्वीच विहिरीत उडी देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नितीन गडकरींना डिवचत भाजपमध्ये घुसमट होत असेल, तर काँग्रेसमध्ये या, असं जाहीर वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. यावर बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, "कोणी द्यावं, कधी द्यावं, ज्याला द्यायचंय त्यानं द्यावं, पण माझी पक्षाशी कटीबद्धता आहे." 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Nitin Gadkari : शेतकऱ्यांनी सरकारी योजनांचा लाभ घेऊन कृषी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात : नितीन गडकरी