मुंबईत रोजी रोटी खाऊन मुजोरी करणाऱ्यांना मनसेनं धडा शिकवायला सुरु केल्यानंतर त्याला मराठी विरुद्ध हिंदी भाषिक देण्याचा प्रयत्न हिंदी भाषिक राज्यांनी आणि मस्तवाल नेत्यांनी सुरु केला आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यावर शिवसेना शिंदे गटाकडून आणि त्यांच्या प्रवक्त्यांकडून हल्ला सुरु आहे. त्यांना मराठी येत नसल्याचा मुद्दा करत ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, पण आता प्रियांका चतुर्वेदी यांनी हॅलो, अमित शाह सेना आणि पेड ट्रोलर म्हणत बोचरा वार केला आहे. माझं मराठी कमजोर होऊ शकते, पण माझं इमान नाही, मी अमराठी होऊ शकते, पण गद्दार नाही, जय महाराष्ट्र, असे म्हणत सडकून प्रहार केला आहे.
माझी मराठी कमजोर असेल पण मी कधीही गद्दार नाही
प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, मी चॅनेलवर दोन दिवसांपूर्वी पक्षाची भूमिका मांडत होते. त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर दिले, माझी भूमिका मी अँकरला सांगितली. ते त्या अँकरला काय समजले ते माहित नाही, पण एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या महिला प्रवक्त्यांनी माझे ट्रोलिंग सुरु केले. मी सहसा ट्रोलिंग उतर देत नाही पण त्या महिला पदाधिकार्याने माझा पत्ता सोशल मिडीयावर टाकला. त्यांनी हद्द पार केली आहे. माझ्या कुटुंबाचे काही झाले तर ती जबाबदारी शिंदे पक्षाच्या प्रवक्त्यांची राहील. त्यांनी पुढे म्हटले आहे की माझी मराठी कमजोर असेल पण मी गद्दार नाही. मी मराठी बोलू शकते पण शिंदेच्या शिवसेनेला वाटते मला अजिबात मराठी येत नाही. यातून त्यांनी माझे ट्रोलिंग सुरु केले. 2 टक्क्यांच्या प्रसिद्धीसाठी व फेमसाठी त्यांनी माझी ट्रोलिंग केली आहे. पण त्यांना सांगते की माझी इमान कमजोर नाही, मी गद्दार नाही एवढेच मी सांगते. याचा विचार शिंदे यांच्या पक्षाच्या तुम्ही महिला प्रवक्त्या आणि सर्व महिला गँगने करावा असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, प्रियांका चतुर्वेदी यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की त्या हिंसाचाराचे समर्थन करत नाहीत, परंतु त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की आतापर्यंत विरोधकांचा मुद्दा का दुर्लक्षित केला जात आहे, ज्यामध्ये आम्ही म्हणतो की पहिलीच्या विद्यार्थ्यांवर तिसरी भाषा लादणे अन्याय्य आहे. त्या म्हणाल्या की, "ही समस्या मनसेने सुरू केलेली नाही, तर महाराष्ट्र सरकारने पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी एक भाषा सक्तीची करण्याच्या आदेशामुळे निर्माण झाली आहे." या चर्चेत असतानाच त्यांच्या मराठीवरून प्रश्न उपस्थित करण्यात आला. या टीकेला त्यांनी मराठीतून उत्तर दिलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या