Sunil Tatkare on Shashikant Shinde: 'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचा हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला
विलिनीकरण संदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी आहेत, या संदर्भामध्ये एखादा प्रस्ताव किंवा एखादा विचार कोणी मांडला तर मग त्या बाबतीमध्ये पक्षाच्या कोअर ग्रुपमध्ये चर्चा होऊ शकते, असे तटकरे म्हणाले.

Sunil Tatkare on Shashikant Shinde: शशिकांत शिंदे यांच्या अदृश्य शक्तीच्या कारवाया धमक्या व षडयंत्र करून केलेल्या आरोपामुळे अजित दादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागणार होता याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे परंतु झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची अशा विचाराने दादा मागील चार पाच महिन्यापासून कामाला लागले होते याला माझा आक्षेप असल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. विलिनीकरण संदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी आहेत, या संदर्भामध्ये एखादा प्रस्ताव किंवा एखादा विचार कोणी मांडला तर मग त्या बाबतीमध्ये पक्षाच्या कोअर ग्रुपमध्ये चर्चा होऊ शकते, असे तटकरे म्हणाले. दादांच्या दुर्दैवी निधनानंतर त्या बैठकीमध्ये काय बोलले असं वक्तव्य करणं हा एक प्रकारचा दादांवर सुद्धा अन्याय होईल. कुठल्या विषयावर काय बोलावं, केव्हा बोलावं याच भान प्रत्येकाने राखणं अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
तर योग्य पद्धतीने सुनील तटकरे उत्तर देईल
शशिकांत शिंदे यांनी जो लेख लिहिला तो अत्यंत चुकीचा आहे, गैरलागू आहे, अशा पद्धतीचं लिखाण त्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे.जे काही शशिकांत शिंदेनी लिहिलेलं आहे ते अनाठायी आहे. अशावेळी लिखाण करून दादांच्या या दुर्दैवी अपघाती निधनानंतर वेगळं काहीतरी जे काही ते साधू पाहता आहेत की काय? त्यांचा हेतू काय ते मला कळू शकलं नसल्याचे ते म्हणाले. यापुढे जर काय ते अशा आरोपांमुळे दादांनी हा निर्णय घेतला असं जर काही बोलत राहतील, तर योग्य पद्धतीने त्यांना उत्तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे देईल, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.
अजित पवारांची भाजपसोबत जाण्याची भूमिका
ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाबरोबर आपण असलं पाहिजे ही भूमिका दादांची अनेक वर्षापासूनची होती. 2014 मध्ये सुद्धा तीच भूमिका होती. 16-17 मध्ये सुद्धा होती ज्याचा मी वारंवार स्पष्टपणाने उल्लेख केला आहे. 2019 मध्ये दादांनी स्वच्छपणे सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार स्थिर राहू शकतं. दादांनी इच्छा कधी लपून ठेवली नव्हती, असा दावा तटकरे यांनी केला.
शशिकांत शिंदेंच्या लेखाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह
तटकरे यांनी सांगितले की, असं लिहिण्याच्या पाठीमागचा त्यांचा हेतू काय ते मला कळू शकलेलं नाही. टाइमिंग लेखाचं म्हणजे ज्या 12 तारखेच्या विलनीकरणाची चर्चा होती. आता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे मासिक आहे दर महिन्याला होत असतं. ती तारीख योगायोग म्हणून आहे का? या लेखाचं शीर्षक आहे की 'भावपूर्ण निरोप अजित दादांना' याचा अर्थ दादांच्या अपघाती निधनानंतरचा तो लेख आहे. दादांबद्दल जे लिहिलेलं आहे त्याला माझा मात्र तीव्र आक्षेप आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























