BhandaraAccidentNews:भंडाऱ्यातभीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.वऱ्हाड्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये चार महिला आणि एका पुरुषांचा समावेश आहे.भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील सौंदडइथं ही घटना घडली आहे.

अड्याळ येथील वऱ्हाडीकोंढायेथून विवाह आटोपून अड्याळ गावाकडे परत येत असताना अपघात घडला आहे. व्हॅनमध्ये9 जण होते. त्यापैकी 5वऱ्हाड्यांचाघटनास्थळीच मृत्यू झाला आगे तर दोन जण गंभीर असून अन्य दोन किरकोळ जखमी आहेत. गंभीर दोघांना भंडाऱ्याला हलविले तर, किरकोळ दोघांवर अड्याळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुर आहेत.

अड्याळ पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्यासौंदड येथील घटना आहे.वऱ्हाड्यांच्याव्हॅनचाटायर फुटल्याने जाणाऱ्याट्रेलरवरव्हॅनधडकून भीषण अपघात झाला आहे. घटनास्थळीअड्याळ पोलीस आणि परिसरातील नागरिकांची मदतीसाठी धाव.ही संपूर्ण माहिती अड्याळपोलिसांनी दिलेली आहे.

पिकअपची दुचाकीला जोरादार धडक, एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू

वाशिम जिल्ह्यात भीषण अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. वाशिम मंगरुळपीर महामार्गावर पारडी  टकमोर गावाजवळ आंबे वाहून नेणाऱ्या पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की अपघातनंतर पिकअप वाहन रस्त्यालगत असलेल्या शेतात खाली पलटी झाला आहे. पिकअप वाहनात या धडकेत वारा देपुळ गावातील एकाच कुटंबातील तीन जण जागीच ठार झाले आहेत. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

गोंदिया जिल्ह्यात भरधाव टिप्परने माय-लेकाला चिरडले, भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

 
गोंदियाच्या तिरोडा शहरातील सुकडी नाका परिसरात आज सायंकाळी एका भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली. ज्यामध्ये माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. काटी-बिरसोला येथील रहिवासी असलेले चौधरी कुटुंब मोटारसायकलने प्रवास करत असताना सुकडी नाका परिसरात पाठीमागून येणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवर स्वार असलेल्या हंसलता चौधरी (वय 35) आणि त्यांचा 9 वर्षांचा मुलगा तन्मय चौधरी हे दोघेही चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मोटारसायकल चालक कामस धर्मदास चौधरी हे या अपघातात जखमी झाले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.अपघात घडल्यानंतर आरोपी टिप्पर चालक आपल्या वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलिसांनी तातडीने धाव घेत मृतदेहांचा पंचनामा केला आणि ते उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.