Hingoli Fire News : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. हिंगोलीच्या काठोडा तांडा या गावातील एका घराला आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये पाच लाख रुपयांची रोकड जळून खाक झाली आहे. यासह घरातील धान्य सोयाबीन कपडे आणि संसार उपयोगी साहित्य देखील जळून खाक झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे अचानक लाग लागल्याची माहिती मिळत आहे. 

रोकडसह घरातील धान्य सोयाबीन कपडे आणि संसार उपयोगी साहित्य जळून खाक 

हिंगोली जिल्ह्यातील काठोडा तांडा या गावांमध्ये वसंत राठोड यांच्या घराला आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळं अचानक लागलेल्या आगीमध्ये घरात पाच लाख रुपयांची रोकड जळून खाक झाली आहे. या रोकडसह घरातील धान्य सोयाबीन कपडे आणि संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. ते सुद्धा जळून खाक झालेले आहे. या आगीमध्ये इतर कोणतेही जीवितहीनी झाली नाही. या आगीमध्ये पाच लाख रुपयांच्या रोकडसह संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

आगीत वसंत राठोड यांचं मोठं नुकसान झाल्यानं परिसरात हळहळ

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, काठोडा तांडा या गावांमध्ये वसंत राठोड यांच्या घराला लागलेली आग ही शॉर्ट सर्किटमुळं लागल्याची माहिती मिळत आहे. यावेळी त्यांच्या घरात पाच लाख रुपयांची रोकड होती. मात्र, भीषण आग लागल्यामुळं घरात जाऊन ती रक्कम बाहेर आणता आली नाही. परिणामी पाच लाख रुपयांची रक्कम जळून खाक झाली आहे. संसार उपयोगी साहित्य देखील जळून खाक झाले आहे. या आगीत वसंत राठोड यांचं मोठं नुकसान झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मीरा रोडच्या शांतीनगर परिसरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना अचानक भीषण आग

मीरा रोडच्या शांतीनगर परिसरात आज संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पार्किंगमध्ये उभी असलेल्या वाहनांना अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. सेक्टर 4 मधील पार्किंगमध्ये उभी असलेली एक कार, एक बाइक आणि एक स्कूटी काही क्षणांत जळून खाक झाली. आग इतक्या तीव्रतेने भडकली की काही मिनिटांत संपूर्ण परिसर धुराच्या लोटांनी व्यापून गेला. प्राथमिक माहितीनुसार, कारच्या बॅटरीमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ दमकल विभागाला माहिती दिली. मात्र, दमकलची गाडी तब्बल अर्ध्या तासानंतर घटनास्थळी पोहोचल्याचे स्थानिकांनी सांगितले. तोपर्यंत तिन्ही वाहनं पूर्णपणे जळून नष्ट झाली होती. आगीच्या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे. परिसरातील नागरिकांनी दमकल विभागाच्या उशिराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत—जर दमकल वेळेवर पोहोचले असते तर नुकसान टाळता आले असते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. घटनास्थळी पोलिस तसेच दमकल विभागाचा पुढील तपास सुरू असून शॉर्ट सर्किट की इतर कोणते कारण आहे याचा शोध घेतला जात आहे. सदर घटनेनंतर शांतीनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.