Maharashtra Rain News :  गेल्या काही दिवसापासून सुरु असलेला पावसाचा जोर  (Heavy Rain) सध्या राज्यात कमी झाला आहे. काही भागात तुरळक पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. 

शेतकऱ्यांनी 6 जून पर्यंत शेतीची कामे करुन घ्यावी

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी 6 जून पर्यंत शेतीची कामे करुन घ्यावी. कारण 7 जून नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे. 7, 8, 9, 10 जूनला दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. ज्यांना हळद लावायची असेल त्यांनी लावू शकता, ज्यांना मूग पेरायचं असेल ते मूग पेरू शकता. कारण की, मूग लवकर पेरणी केली तर त्या मुगाला खूप चांगला उतार येतो. 

13 ते 17 पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार 

उडीद पेरायचे असेल तर ते देखील पेरु शकता. कारण की जमिनीमध्ये एक ते दोन फुटांपर्यंत ओल गेली आहे. 13 जून नंतर राज्यात पुन्हा पुन्हा मुसळधार पाऊस येणार आहे. 13 ते 17 पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे. यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पेरणी होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली. महाराष्ट्रातले शेतकरी हुशार आहेत. मी स्वतः शेतकरी असल्यामुळे पेरणीचा निर्णय स्वतः घेत असतो. शेतकऱ्यांना माहित असते जमिनीत इतभर ओल असली तर पेरल तर उगवून निघते. हे शेतकऱ्याला कळतंय म्हणून शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा असेही हवामान अभ्यासक पंजाबराव डख म्हणाले. 

कुठे कुठे पडणार पाऊस?

नंदुरबार, धुळे, मालेगाव, पारगोळा, जळगाव, 3, 4 जूनला थोडा पाऊस पडणार आहे. कोकणात सरीसरी चालूच राहणार आहेत. कोल्हापूर तिकडल्या भागात देखील ना 31 मे ते 7 जूनच्या दरम्यान पावसाच्या सरी येईल. नंदुरबार, धुळे तिकडे देखील 4, 5 जूनला सरी येतील. 1 जून ते 6 जून एकदम पाऊस असा उघडणार नाही, कुठेतरी स्थानिक वातावरण तयार होऊन थोडा पाऊस येईल. 

महत्वाच्या बातम्या:

Pune Rain Updates: बारामती पट्ट्यात ढगफुटीसारखा पाऊस, कालवा फुटला, नद्यांना पूर, घराघरांत पाणी; दौंड-इंदापूरलाही झोडपले