Maharashtra Rain: राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. सध्या जरी पावसाने (Rain News) राज्यातील काही भागात उसंत घेतली असली तर पावसाच्या विश्रांतीनंतर पाऊस आणि पुराच्या पाण्याने केलेल्या नुकसानाची दाहकता समोर आली आहे. अशातच पश्चिम महाराष्ट्र्रात देखील पावसाचा (Maharashtra Rain) जोर बघायला मिळत आहे. सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. परिणामी सततच्या पावसामुळे आणि धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे कृष्णा, कोयना आणि वेण्णा नद्या दुतडी भरून वाहत आहेत. साताऱ्यातील (Satara Rain) संगम माहुली परिसरातील छत्रपती शाहू महाराज यांची समाधीला पाण्याने वेडा घातला आहे. तर तिकडे मुंबईच्या (Mumbai Rain) पश्चिम उपनगरात देखील पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने आज मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्राला यलो अलर्ट (Yellow Warning) दिला असून काही ठिकाणी 30-40 किमी प्रतितास वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Continues below advertisement

Satara Rain: कोयना, कृष्णा, वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा

दरम्यान, साताऱ्याची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 91.42 टीएमसीवर पोहोचला आहे. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे पाच फुटांपर्यंत खाली आणून एकूण 30 हजार 223 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला जाणार आहे. तर धोममधून कृष्णेत 6 हजार, तर कन्हेरमधून वेण्णेत 2 हजार 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा आणि वेण्णा नद्या दुथडी भरून वाहत असून काही पूल पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी धरणातील पाण्याचा विसर्ग कायम असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे

Continues below advertisement

Maharashtra Rain: मुंबई, ठाणेसह रायगड जिल्ह्यालापावसाचायलोअलर्ट

मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील दहा ते पंधरा मिनिटांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालीआहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या सर्व परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. असच जोरदार पाऊस काही वेळ सुरू राहिला तर पश्चिम उपनगरी सखल भागात पाणी भरायला सुरुवात होणार असल्याचीशक्यताआहे. अंधेरी परिसरात देखील पावसाचा जोर असल्याचेचित्रआहे. तरप्रादेशिक हवामान विभागानेपुढील 3 तासांसाठी तात्काळ इशारा (Nowcast Warning) दिलाअसूनयामुंबई, ठाणेआणिरायगडजिल्ह्यालायलोअलर्ट (Yellow Warning) जाहीरकेलाआहे. परिणामीयाजिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवलीआहे.

Girish Mahajan Jalgaon: जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टी, एनडीआरएफच्या नियमानुसार तात्काळ मदत केली जाणार

जळगावजिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागात दोन तीन दिवसात पंचनामे पूर्ण करून एनडीआरएफच्या नियमानुसार मदत केली जाणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटल आहे. पाचोरा, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, तसेच काही अंशी यावल आणि रावेर या भागांमध्ये अतिवृष्टी झाली. अनेक वर्षानंतर मोठ्या प्रमाणात नदी झाल्यानंतर पूर आले. त्यामुळे मोठं नुकसानही त्याठिकाणी झाला आहे. वॉल कंपाऊंड तुटल्यामुळे अमळनेरमध्ये व्यापारी संकुलात पाणी आलं आणि त्या ठिकाणी धान्य व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 50 ते 55 जनावर वाहून गेलीत, तीन-चार जणांचा मृत्यू झाला. बऱ्यापैकी नुकसान या अतिवृष्टीमुळे झाले. शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वांचे पंचनामा करण्याचे आदेश तातडीने देण्यात आले आहेत. सर्व पंचनामे होत आहेत. दोन-तीन दिवसात सर्व पंचनामे होतील आणि जेएनडीआरएफच्या निकषानुसार मदत देतायेईल ती सर्वांना देण्यात येईल. अशीप्रतिक्रिया गिरीश महाजन यांनीदिली.

इतर महत्वाच्या बातम्या