Maharashtra Rain: राज्यातीलबहुतांश जिल्ह्यालामुसळधारपावसानेअक्षरशःझोडपूनकाढलंआहे. परिणामीनदीनाल्यासहधरणांच्याजलसाठ्यातमोठीवाढझालीआहे. अशातच उजनी धरणादेखीलमोठ्याप्रमाणतपाण्याचीपातळीवाढलीआहे. परिणामी उजनी धरणातून (Solapur Ujani Dam) सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे पंढरपूर (Pandharpur) शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तरतिकडे भीमा नदीनेदेखील इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केलीआहे. अशातच नदीकाठी असणाऱ्या व्यास नारायण वसाहतीमध्ये पाणी शिरल्याचेचित्रअसून स्थानिक प्रशासन, पोलीस आणि नगरसेवकांनी रात्री उशिरा या भागातील नागरिकांचे स्थलांतर केले आहे.

Continues below advertisement
Pandharpur Chandrabhaga River: चंद्रभागा नदीची इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल

उजनी आणि वीर धरणाच्या पाण्यामुळे पंढरपुरात भीमा अर्थात चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. 443 मीटरची इशारा पातळी ओलांडून भीमा नदी प्रवाहित होत आहे. सध्या भीमा नदीत 1 लाख 6 हजार इतका विसर्ग होत आहे. सध्या चंद्रभागेचे पाणी वाळवंट आणि घाटावरून रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे उजनी धरणातून सोडण्यात येणारा 90000 चा विसर्ग आता कमी करून 75000 केल्याने पुढील दोन दिवसात पुणे आणि सातारा परिसरात पाऊस न झाल्यास पूरग्रस्त पंढरपूरला दिलासा मिळू शकणार आहे

Continues below advertisement

Satara Rain : कृष्णेचा रौद्रावतार! कोटेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा

साताऱ्यात कृष्णा नदीने पुन्हा रौद्ररूप पहिला मिळत आहे. साताऱ्यातील लिंब-गोवे परिसरातील ऐतिहासिक कोटेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. नदीचा प्रवाह दुतर्फा झाल्याने मंदिराकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेला असून, भाविकांना दर्शनासाठी मंदिरात जाता येत नाही.मंदिराजवळील जुना पूल, लिंबचा पुरातन घाट आणि मर्ढे-आनेवाडी दरम्यानचा पूलही पाण्याखाली गेला आहे. धोम-बलकवडी धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यातच पावसाचा जोर कायम असल्याने कृष्णेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, नदीकाठच्या परिसरात पुन्हा पूरस्थितीचं सावट निर्माण झालंय.

Pune : रेड अलर्टमुळे सिंहगड किल्ला आज पर्यटकांसाठी बंद

पुणे जिल्ह्यात हवामान विभागाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक किल्ल्यावर येतात मात्र रेड अलर्ट असल्याने आज किल्ल्यावर बंदी आहे ..मुसळधार पावसामुळे घाटरस्त्यावर दरड व दगड कोसळण्याचा धोका वाढल्याने पुणे वन विभागाने हा निर्णय घेतला. नागरिकांनी सिंहगड परिसरात जाणे टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Sangli Koyna Dam : कोयनेच्या विसर्गाने सांगलीत कृष्णा नदीची पातळी 29 फुटांवर

कोयना धरणातून सुरू असलेल्या विसर्गाचा परिणाम कृष्णा नदीच्या पाणीपातळीवर होत आहे. सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी आज सकाळी २९ फुटांवर पोहोचली. मात्र, काल दिवसभरात झालेल्या वाढीनंतर आता पाणीपातळीत संथ गतीने वाढ होत आहे.कोयना धरणातून वाढवण्यात आलेल्या विसर्गामुळे शनिवारी कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ झाली होती. मात्र, शनिवारी दुपारपासून पाणीपातळी वाढीचा वेग कमी झाला असून नदीची पातळी हळूहळू वाढत आहे. जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा नदीच्या पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या