पुणे: महाराष्ट्रात सध्या उन्हाची तीव्रता कमालीची वाढली असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे आणि उष्ण आहे. किनारपट्टीच्या भागात उकाडा आणि दमटपणा जाणवत असून, काही ठिकाणी उष्णतेच्या (Maharashtra Weather Update) लाटेचा प्रभाव आहे. पुढील दोन दिवस पावसाची शक्यता नसली, तरी १३ आणि १४ मार्च रोजी विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)
मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकण पट्ट्यात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहील. आज पाऊस पडण्याची शक्यता नसून, काही भागांत उष्णतेची लाट जाणवू शकते. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे. आज जरी पावसाची चिन्हे नसली, तरी १४ मार्चपासून काही ठिकाणी हलक्या सरी कोसळू शकतात. आज हवामान कोरडे राहील, मात्र १३-१४ मार्चला विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.(Maharashtra Weather Update)
तर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात लक्षणीय वाढ होत असल्याची माहिती पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ सखा सानप यांनी दिली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. राज्यात सध्या अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पुण्यात आज ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.(Maharashtra Weather Update)
मुंबईसह समुद्रकिनारपट्टी भागातही तापमानात मोठी वाढ झाली आहे. काही भागांमध्ये पहाटेच्या सुमारास प्रदूषणामुळे धुक्यासारखी चादर पसरलेली दिसून आली. मात्र यामुळे कोणताही धोका नसून नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. विदर्भात तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. पुढील दोन दिवसांत मुंबई आणि कोकण परिसरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या गुजरात आणि महाराष्ट्र या भागात प्रतिचक्रवर्ती परिस्थिती निर्माण झाल्यामुळे उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत तापमान वाढले आहे.(Maharashtra Weather Update)
मात्र राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट नसून विदर्भ आणि कोकणात काही प्रमाणात उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे. तसेच १४ मार्चनंतर विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ही माहिती पुणे वेधशाळेचे हवामानतज्ज्ञ सखाराम सानप यांनी दिली असून याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडून जाणून घेतली.
