मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी तसेच भाजपचे दिवंगत माजी आमदार सरदार तारासिंह यांचा मुलगा रणजित सिंह याला मुंबई उच्च न्यायालयानं वडिलांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी मिळावी यासाठी रणजित सिंहच्यावतीनं शनिवारी हायकोर्टात तातडीच्या सुनावणीसाठी याचिका दाखल केली गेली होती. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी या अर्जावर तातडीने सुनावणी घेत मानवतेच्यादृष्टीने रणजित सिंहचा अर्ज मंजूर केला.


पीएमसी बँकेच्या सुमारे 4355 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात रणजित सिंहला अटक केली आहे. रणजित सिंह पीएमसी बँकेचा माजी संचालक असून मुलूंडहून माजी भाजपा आमदार सरदार तारासिंह यांचा मुलगा आहे.


तारासिंह यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहता यावे यासाठी रणजितसिंह यानं हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी हा अर्ज मंजूर करत सोमवारी रणजित सिंहला आपल्या कुटुंबियांची भेट तसेच तेराव्या दिवशी कार्याला पोलीस बंदोबस्तात उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. यासाठी रणजितसिंह यांना जेलमधून ने आण करण्याचा खर्च सरकारी तिजोरीतून करण्याचे निर्देशही हायकोर्टानं दिले आहेत.


Former BJP MLA Sardar Tara Singh dies | भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचं निधन