Hasan Mushrif In Pune: राज्यसभेच्या (Rajya sabha election 2022) सर्व जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी व्यक्त केला आहे. ते पुण्यात बोलत होते. मुंबईत महाविकास आघाडीतर्फे बैठक बोलवली आहे. त्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. निवडणुकींच्या वेळी अशा बैठका घेतल्या जातात, असंही ते म्हणाले.

Continues below advertisement

मतदान कशाप्रकारे केलं जातं, यासंदर्भातलं मार्गदर्शन केलं जातं. जेवढे उमेदवार तेवढी पसंती देण्याचा अधिकार मतदाराला असतो. आमदारांना समजावून सांगण्यासाठी या बैठका घेतल्या जातात. पक्षातील उमेदरावांबाबत काही अडचण नाही. त्यांनी मतदान केल्यानंतर आपल्या प्रतिनिधींना दाखवण्याचा अधिकार राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी दिला जातो. अपक्ष आणि छोटे पक्ष असणाऱ्या लोकांचा प्रश्न आहे. मात्र काही वर्षांत या अपक्ष आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा संपर्क वाढला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असंही ते म्हणाले.

पडळकरांना आवरा

Continues below advertisement

कमरेखाली बोलायची आम्हाला गरज नाही, राष्ट्रवादी वाल्यांनाच हे विचारा.. शरद पवार आणि रोहित पवार यांचा चौडीत संबंध काय? महत्वाचे म्हणजे शरद पवार यांच आता वय झालंय, त्यांनी घरी बसावं, अशी जहरी टीका गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी नाशिकमध्ये केली होती. पडळकरांच्या विधानावर हसन मुश्रीफ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या नेते मंडळींनी त्यांचे आघाडीचे नेते पडळकरांना रोखलं पाहिजे, असा खोचक सल्ला त्यांनी भाजपनेत्यांना दिला आहे.

कोल्हापूर पॅटर्न दिसणार 

राज्यसभेच्या निवडणुकीत निवडणुकीत कोल्हापूर पॅटर्न दिसणार आहे. आमदारांची संख्या 42 वरुन 41 वर गेली आहे. त्यात 2, 3 आमदार निवडणुकीत भाग घेणार नाही, असं दिसतंय. त्यामुळे कोटा कमी व्हायची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार देण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे, असंही ते म्हणाले

मराठी पाट्यांवर कारवाईमहाराष्ट्रातील दुकानांवरील मराठी पाट्यांवर महानगरपालिका कारवाई करेल, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.  दुसऱ्या भाषेत तुम्ही लिहा मात्र मराठीत नाव मोठंच पाहिजे, असंही ते म्हणाले