एक्स्प्लोर

हर्षवर्धन सपकाळांनी महाराष्ट्राची आणि शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी, मनसे आक्रमक, सपकाळांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

टिपू सुलतान याची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सर्वच स्तरातून सपकाळांना विरोध होत आहे.

मुंबई :  टिपू सुलतान याची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्यासमोरील अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे. सर्वच स्तरातून सपकाळ यांना विरोध होताना दिसत आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील आपली भूमिका जाहीर केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच सपकाळांनी महाराष्ट्राची आणि शिवप्रेमींची माफी मागावी असे मनसेनं म्हटलं आहे. 

हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर मनसेची टीका

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानाशी केली आहे. ही अत्यंत निंदनीय बाब आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा तीव्र निषेध नोंदवत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राची आणि शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी असे ट्वीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय? 

मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला होता. त्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर अखेर हटवण्यात आला. मात्र, याच वादानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यासंदर्भात एक वक्तव्य केलं. 'टिपू सुलतानला छत्रपती शिवरायांच्य़ा समकक्ष बघितलं पाहिजे, असं सपकाळ यांनी म्हटलं. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केलं, असं सपकाळ म्हणाले. सपकाळ यांच्या या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलं. भाजप आणि शिवसेनेने सपकाळ यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात पुण्यातील पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्यासोबत केल्याच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात पुण्यातील पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्या वक्तव्याची मोडतोड केली : हर्षवर्धन सपकाळ

टिपू सुलतानाच्या वक्तव्यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अखेर मौन सोडलं आहे. माझ्या वक्तव्याची मोडतोड करून "ध" चा "मा" करुन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये केला. तसेच पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली. 

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मार्च 2026 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मार्च 2026 | सोमवार
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
Mumbai Bike Taxi : मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
Embed widget