ST Bank Rada : महिलांना लैंगिक त्रास दिला म्हणून आम्ही त्यांना ठेचलं, एसटी बँकेच्या राड्यानंतर सदावर्तेंनी भूमिका मांडली, पुरावे असल्याचा दावा
ST Bank Meeting Rada : आनंदराव अडसूळ हे अनुसूचित जाती-जमातीविरोधात काम करत असून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

मुंबई : एसटी बँकेच्या संचालकांच्या बैठकीमध्ये झालेल्या राड्यानंतर (ST Bank Meeting Rada) अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांनी आपली भूमिका मांडली. आमच्या लाडक्या बहिणींना त्रास दिला, त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आलं म्हणून आम्ही त्यांना ठेचलं असं सदावर्ते म्हणाले. आम्ही प्रसिद्धीसाठी हापापलेले नाही, पण सगळे पुरावे हाती असल्याने आम्ही हे सांगतोय. पोलिसांनी अभ्यासाअंती त्या लिंगपिसाटांवर गुन्हे दाखल केले आहेत असा दावाही सदावर्ते यांनी केला.
एसटी बँकेच्या बैठकीत झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे असं सदावर्ते म्हणाले. स्वतःचा बचाव कसा करावा यासाठी विरोधकांनी थातूरमातूर कट रचला असा दावाही सदावर्तेंनी केला.
Gunratan Sadavarte PC : लाडक्या बहिणींना त्रास दिला
गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, एसटी बँकेमध्ये जो राडा झाला त्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना त्रास दिला म्हणून आम्ही त्यांना ठेचलं. विरोधकांमध्ये काही लोक असे आहे जे अहिल्यादेवी होळकरांच्या लेकींवर अपप्रवृत्तीने नजर ठेऊन आहेत. आमच्या काही महिला पदाधिकाऱ्यांना लैंगिक शोषणाचा त्रास देण्यात आला. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या संरक्षणार्थ आम्ही त्यांची अंडी केली.
विरोधकांनी एका मराठा, एका आदिवासी आणि एका वंजारी समाजाच्या, अशा तीन महिलांना त्रास दिला. विरोधकांनी महिलांना जो त्रास दिला त्यामुळे आमच्या भावनांचा उद्रेक झाला, अशा लिंगपिसाटांना ठेचण्यात आलं असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
Gunratan Sadavarte Vs Anandrao Adsul : आनंदराव अडसूळा यांची हकालपट्टी करा
गुणरत्न सदावर्ते यांनी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, "एसटी बँकेच्या राड्यानंतर आनंदराव अडसूळ पोलास स्थानकात का गेले? अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांवर अत्याचार केलेल्या आरोपींना पाठिंबा देण्यासाठी गेले होते का? त्यांच्याविरोधात बँक बुडवल्याचे आरोप आहेत. आयोगाच्या जातीतील लोकांविरोधातच हा माणूस अत्याचार करत आहे. याचा रोल काय आहे? अडसूळ यांची आयोगावरुन हकालपट्टी करा."
ST Bank Meeting Rada : एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार
लय जुनं म्हातारं आहे म्हणून शिंदे साहेब त्याला सोबत ठेवत असतील. लौंगिक अत्याचार करणाऱ्यांना पाठबळ द्या असं शिंदे साहेब कधीच म्हणणार नाहीत. आम्ही शिंदे साहेबांकडे आनंदराव अडसूळ यांची तक्रार करणार आहोत असं सदावर्ते यांनी सांगितलं.
ही बातमी वाचा:



















