Gunaratna Sadavarte Jalna News : अॅड गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राजेश टोपेंनी सांगून टाकावं की त्यांनी मनोज जरांगेंना (Manoj jarange) काय काय मदत केली आहे. छगन भुजबळ यांचं वाक्य ना वाक्य सत्य आहे. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. राजेश टोपे यांनी उदार अंतकरणाने सांगावं की किती बैठका झाल्या? काय बोलणे झाले? असे सदावर्ते म्हणाले. हिंसक गोष्टी त्यांना माहीत होत्या का नव्हत्या? असे सदावर्ते म्हणाले. आम्ही हाके साहेबांसाठी गोपीचंद पडळकर, छगन भुजबळ साहेबांसाठी बोलणारच असे सदावर्ते म्हणाले. जिथे आरे असेल तिथे कारे असेल असेही ते म्हणाले.
अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यावरही टीका
भुजबळ यांनी बोललेलं वाक्य ना वाक्य सत्य असून राजेश टोपे यांनी उदार अंतकरणाने सांगावं की अंतरवाली सराटीमध्ये किती बैठका झाल्या आणि कोणत्या हिंसक गोष्टी त्यांना माहिती होत्या. तसेच मनोज जरांगे यांना त्यांनी काय काय मदत केली असे ॲड गुणरत्न सदावर्ते म्हणाले. जालना येथे धनगर समाजानं सुरु केलेल्या आंदोलनाला सदावर्ते यांनी भेट दिली, त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलवत होते. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यावर देखील सदावर्ते यांनी टीका केली. तू कलाकार आहेस. गावकी काय आहे? गावठीमध्ये म्हटलं आहे की पाटलांनी सांगावं आणि बारा बलुतेदारांनी ऐकावं. गावकी नको, संविधान म्हण असे सदावर्ते म्हणाले.
माझा धंदा रेतीचा नाही. मी टिप्परवाला नाही. मी चपटी पीत नाही चपटी पाजत नाही असेही सदावर्ते म्हणाले. एसटी आरक्षणाची रस्त्यावर नाही तर न्यायालयात सुद्धा ही लढाई आपल्याला लढावी लागेल असे सदावर्ते म्हणाले. धनगर समाजाला एसटी प्रवर्गासाठी मागासलेपण सिद्ध करण्याची गरज नाही.यंत्रणा हलवा आणि बोराडे यांच्याकडे या. येताना नुसतं येऊ नका कायदा घेऊन या असे सदावर्ते म्हणाले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींचे उपोषण सोडवलं आणि गांधीजींचे प्राण वाचवले
कायदा हातात कुणी घ्यायचा नाही, सुप्रीम कोर्ट आणि भारताचं संविधान आपल्या सोबत आहे. देवेंद्रजींचं सरकार शिंदे साहेबांचे सरकार अजित दादाचं सरकार माझ्या भावाची मागणी पूर्ण करेल ही अपेक्षा असल्याचे सदावर्ते म्हणाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींचे उपोषण सोडवलं आणि गांधीजींचे प्राण वाचवले, त्याचप्रमाणे देवेंद्रजी तुम्ही बोराडे साहेबांना त्यांच्या जीवनाला काही होऊ नये याची काळजी करा असे सदावर्ते म्हणाले. धनगर से पंगा महंगा पडता है असेही ते म्हणाले.