Chandrashekhar Bawankule : नागपूरमध्ये ओबीसी समाजाने आज भव्य मोर्चा काढला. यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या मोर्चात ओबीसी समाजाची पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचं नियोजित षडयंत्र आहे. 2 सप्टेंबरचा जीआर फक्त मराठवाड्यापुरता मर्यादित आहे. , मराठवाड्याबाहेरचा हा जीआर नसल्याचे बावनकुळे म्हणाले. बैठक झाली तेव्हा विजय वडेट्टीवार आणि इतर प्रतिनिधी आले होते. प्रत्येक मुद्द्यावर शिष्टमंडळाचा संभ्रम आणि गैरसमज दूर केला होता. या जीआरचा कोणीच दुरुपयोग करणार नाही. जो खरा कुणबी त्यांनाच सर्टिफिकेट मिळेल असे बावनकुळे म्हणाले.
ओबीसी समाजाचं आरक्षण गेलं, वडेट्टीवार त्यावेळी मंत्रीमंडळात होते
उद्धव ठाकरे सरकार असताना ओबीसी समाजाचं आरक्षण गेलं, वडेट्टीवार त्यावेळी मंत्रीमंडळात होते. देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून दिल्याचे बावनकुळे म्हणाले. सत्तेत असताना काही करायचं नाही, आणि सत्ता गेल्यावर कांगावा करायचा. ओबीसी समाजाला कुठलाही धक्का लागणार नाही, असं वचन शिष्टमंडळाला दिलं असल्याचे बावनकुळे म्हणाले. त्यांना अजून खुलासे हवे असतील स्पष्टीकरण हवं असेल तर आम्ही ते करायला तयार आहोत असे बावनकुळे म्हणाले. आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसी समाजचं हित आमचं सरकार जाऊ देणार नाही असेही बावनकुळे म्हणाले. हा जीआर केवळ हैदराबाद गॅझेट संदर्भात काढलेला आहे. केवळ मराठवाड्यापुत मर्यादित आहे. राज्यात कुठेही हा जीआर लागू नाही असे बावनकुळे म्हणाले. त्यामुळं ओबीसी समाजाची दिशाभूल थांबवली पाहिजे असे ते म्हणाले.
छगन भुजबळांना वारंवार सांगितलं आहे की, प्रांत आणि तहसीलदार खोटे, चुकीचं प्रमाणपत्र देणार नाहीत. याची काळजी सरकारने घेतलीय, एकही प्रमाणपत्र खोटं दिलं जाणार नाही असे बावनकुळे म्हणाले. माणिकराव कोकाटे हे परदेशात गेले असतील, तर क्रीडा विभागाचे काही नियोजित कार्यक्रम असतील असे बावनकुळे म्हणाले.
कुठे देवेंद्र फडणवीस, कुठे सपकाळ? त्यांची बोलण्याची उंची आहे का?
हर्षवर्धन सपकाळ फडणवीस यांच्याबद्दल बोलले तरच मिडिया त्यांची दखल घेईल, असं त्यांचं मत असेल. कुठे देवेंद्र फडणवीस, कुठे सपकाळ? त्यांची बोलण्याची उंची आहे का? काय बोलतात असे बावनकुळे म्हणाले. पूर्णच काँग्रेस साफ झाली आणि आता हे तोंडाच्या वाफा दवडत्यात. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखा आहे असे बावनकुळे म्हणाले.
एकही शेतकरी पॅकेजच्या मदतीपासून राहणार नाही
एकही शेतकरी पॅकेजच्या मदतीपासून राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा पर्याय तपासावा, तसं होत नसेल तर मैत्रीपूर्ण लढती करा. उत्तर महाराष्ट्रातील आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. महायुतीत मनभेद होणार नाही, याची काळजी घेण्याच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकाल चांगले लागतील असेही बावनकुळे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचं वचन दिलं आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचं वचन दिलं आहे, ते वचन पूर्ण होणार आहे. पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सरकारची भूमिका आहे. शासन कर्जमाफी करणार आहे. निवडणुकीत दिलेल वचन कार्यकाळात पूर्ण करायचं आहे. 2029 ला कर्जमाफी दिली तरी त्यांचं कर्ज माफ होणारच आहे असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले. मतदान करणारा व्यक्ती जात धर्म पंथ सोडून विकासाला मतदान करतो. राज्यातील जनता महायुतीला मतदान करेल. निवडणूक समोर आहे, कुठल्याही व्यक्तीवर दोषारोप करून उपयोग नाही. निर्णय केवळ मराठवाड्यापुरता, पूर्ण महाराष्ट्रासाठी नाही. संभ्रम तयार करणाऱ्या लोकांनी त्या जीआरच्या चुकीचा अर्थ काढून ओबीसींना भडकवू नये, गैरसमज करू नये असे बावनकुळे म्हणाले.
दिवाळीपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल
एवढी मोठी मदत शेतकऱ्यांना वाटप करायची आहे. एकही व्यक्ती चुकू नये, याची काळजी घ्यायची आहे. जे भाग सुटले त्याचा देखील समावेश करायचा आहे. राज्यातील पूर हमीच सर्वात मोठ पॅकेज आहे. मदत पोहचायला वेळ लागेल, मात्र दिवाळीपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अस बावनकुळे म्हणाले. माझ्यावर देखील उद्धव ठाकरे सरकारमध्ये गुन्हा दाखल झाला होता, कोर्टाने सोडलं. कोर्ट ऑर्डर आल्याशिवाय तो गुन्हेगार ठरत नाही, मात्र जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे असे बावनकुळे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: