नवी दिल्ली/मुंबई : केंद्र सरकारने कांद्याचं निर्यातमूल्य 850 डॉलर प्रतिटन केलं आहे, ज्यामुळे कांद्याचे दर कमी होऊ शकतात. त्यामुळे या निर्णयाविरोधात कांदा उत्पादक व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप कांदा व्यापारी देवदत्त होळकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.
''केंद्र सरकारने घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. यामुळे कांदा उत्पादकांचं नुकसान होणार आहे. एकवेळ अशी होती, जेव्हा 300 रुपये प्रति टन दराने कांदा विकावा लागला. मात्र आता भाव वाढले असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान होतं. त्यातच सरकारने राजकीय हस्तक्षेप केला'', असा आरोप देवदत्त होळकर यांनी केला.
''सध्या नवीन लाल कांद्याचा सीजन सुरु झाला आहे. हा कांदा फार काळ टिकणारा नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागणार आहे. सरकारला वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. मात्र तरीही हा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे'', असंही देवदत्त होळकर म्हणाले.
कांद्याचं निर्यातमूल्य घटवलं, केंद्र सरकारविरोधात शेतकरी आक्रमक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Nov 2017 07:56 PM (IST)
शहरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप कांदा व्यापारी देवदत्त होळकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -