सोशल मीडियाच्या वापरासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना नवीन नियमावली, शिस्तभंग कारवाई होणार, नेमका काय आहे निर्णय?
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या वापरासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना नवीन नियमावली जाहीर केली आहे.

मुंबई : राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गोपनीय शासकीय माहितीचा प्रसार करणे, खोट्या गोष्टी सोशल मीडियाद्वारे पसरविणे, शासकीय नियमांचे उल्लंघन करुन समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करणे यासह अनेक बाबी टाळण्यासाठी शासनाकडून नव्याने सूचना जाहीर करण्यात आली आहे. शासकीय सूचनांचे पालन न केल्यास कर्मचाऱ्याला शिस्तभंग कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून नव्या सूचनांचे परिपत्रक जाहीर केलं आहे. याद्वारे आता शासकीय कर्मचाऱ्यांना गोपनीय शासकीय माहितीचा प्रसार करणे, खोट्या गोष्टी सोशल मीडियाद्वारे पसरविणे, शासकीय नियमांचे उल्लंघन करुन समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासंदर्भात सूचना जाहीर केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
तरुणीची बदनामी केल्याचा आरोप, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर चंगळ्याच्या अडचणी वाढणार? पुण्यातील वकिलाने नोटीस पाठवली

























