जयंत पाटील कासेला मोठे पण दुधाला नाही, त्यांनीचं सांगलीच सर्वाधिक वाटोळं केलं, पडळकरांचा प्रहार
भाजप आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil ) यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली आहे.
Gopichand Padalkar on Jayant Patil : भाजप आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil ) यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली आहे. जयंत पाटील यांनीच सांगलीच सर्वाधिक वाटोळं केल्याचं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. जयंत पाटील हे कासेला मोठे आहेत, दुधाला नाही अशी खालच्या शब्दात टीका देखील पडळकर यांनी केली. तसेच शरद पवार यांच्यावर बोलू नका, अशा पक्षाच्या सूचना असल्याची स्पष्टोक्ती गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
सांगलीचं सर्वाधिक वाटोळ जयंत पाटील यांनीच केलं
सांगलीचं सर्वाधिक वाटोळ जयंत पाटील यांनीच केल्याचा घणाघात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. सांगलीत मनोज सरगर यांच्या पक्षप्रवेश मेळाव्यात पडळकर बोलत होते. जयंत पाटील हे कासेला मोठे आहेत, दुधाला नाही अशी दुभत्या जनावराची उपमा देत गोपीचंद पडळकर यांनी खालच्या शब्दात जयंत पाटील यांच्यावर टीका केली. जयंत पाटील यांचा नेताही तसाच आहे. शरद पवार यांच्यावर बोलू अशा मला पक्षाच्या सूचना असल्याचे पडळकर म्हणाले. सांगलीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नंतर कोणाची किती ताकद आहे हे कळेल. जयंत पाटील यांच्यासह विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे सांगत त्यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली.
माजी नगरसेवक मनोज सरगर यांचा भाजपमध्ये प्रवेश
भाजपकडून खासदार विशाल पाटील यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना भाजपत घेण्यास सुरुवात केली आहे. जयश्री मदन पाटील या खासदार विशाल पाटील यांच्या चुलत वहिनी आहेत. त्यानी देखील काही दिवसांपूर्वी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता विशाल पाटील यांना निवडून आणण्यात वाटा असलेले माजी नगरसेवक मनोज सरगर आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण स्वतः उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर जहरी टीका केली. एका हमालाच्या पोराच्या पक्ष प्रवेशाला एवढी गर्दी होत असेल तर तुम्ही विचार करा. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणाची किती ताकद आहे हे तुम्हाला कळणार आहे असे पडळकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:























