Gopichand Padalkar : हिंदू संस्कृतीच जगाला वाचवू शकते असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राजकारण दुय्यम भाग आहे. इथून पुढे आता धर्माचे काम करायचे आहे. आम्हाला आता धर्म रक्षक व्हायचे आहे असे गोपीचंद पडळकर म्हणाले. ते आज बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कपाळावर सुद्धा अहिल्यानगर लिहावं लागेल
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना मानणारे हे सरकार आहे. बारकी मुलं रडल्यासारखं आव आणता असे म्हणत पडळकरांनी विरोधकांवर टीका केली. तुम्ही कायद्याच्या देशात राहता अहिल्यानगर कसे बोलणार नाहीत. कपाळावर सुद्धा अहिल्यानगर लिहावं लागेल. मुलाच्या दाखल्यावर सुद्धा हे नाव लिहावं लागणार आहे. मुघल औरंगजेब ही नावं पुसली पाहिजे असे पडळकर म्हणाले. बीड जिल्ह्यात जहांगीर मोहा नावाचे गाव त्याच नाव बदला. अशा गावांची नावं बदला. मुघलांच्या वारसांची नावाची गावं याचे नाव बदलली पाहिजे. गावातील लोकांना आवाहन आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन दणक्यात नावे बदलून टाकणार असल्याचे पडळकर म्हणाले.
बुलडोझर फिरवून हे अतिक्रमण उध्वस्त करा
मी डिसेंबर अधिवेशनात हे प्रश्न मांडून जाब विचारणार असल्याचे पडळकर म्हणाले. शहरातील अतिक्रमणावर गोपीचंद पडळकर यांनी लक्ष वेधले आहे. बुलडोझर फिरवून हे अतिक्रमण उध्वस्त करा असेही पडळकर म्हणाले. हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. तिथे पोलिस चौकी उभारा असे पडळकर म्हणाले. हिंदू मुलींना विनंती हे षडयंत्र ओळखा. छेडछाडीचे प्रमाण धार्मिक स्थळी वाढले आहे.मी माहिती घेऊन बोलत आहे. कलेक्टर ऑफिस बाहेर अतिक्रमण आहे ते हटवा असेही पडळकर म्हणाले.
अहिल्यानगर रोड वरचे थडके काढले पाहिजे. नदीत अतिक्रमण केले त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असे पडळकर म्हणाले. ही तुमच्या बापाची प्रॉपर्टी नाही. बुलडोझर घालून उध्वस्त करा मंदिरा समोर मटण शॉप थाटले आहे. आमच्या देवाची विटंबना चालणार नाही. सरकारी जागेत अतिक्रमण थाटले आहे असे पडळकर म्हणाले.
जिहादी चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत आणि त्याला हे प्रतिउत्तर आहे. सरकारमध्ये असताना मोर्चा काढण्याची गरज काय? असासवाल देखील पडळकरांनी केला. सरकारमधील नेता खमक्या आहे. देवा भाऊ हिंदूचे रक्षण करण्यास खंबीर आहेत. सरकार सरकारच्या पद्धतीने काम करत आहे गो हत्या बंदीचा कायदा आणल्याचे पडळकर म्हणाले. बीड मधल्या तुरुंगात पेट्रस गायकवाड नावाचा जेलर आहे ही औलाद त्याच्या पुढची आहे. कैद्यांची व्यवस्था बघणे हे त्याच काम मात्र हा धर्मांतराचे रॅकेट चालवतो. गायकवाडने काय केलं? शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचा फोटो काढला आहे. एवढ्यावर तो थांबत नाही तर महापुरुषांचे फोटो काढले. तर जेलच्या एन्ट्रीला बायबलचे स्लॉगन लावले आहे. जेल मधील कीर्तन बंद केले आहे. हे जेलरचे काम आहे का? कैद्यांना धर्मांतर करण्यासाठी आमिष दाखवली जात आहेत. यावर काय कारवाई केली पाहिजे? हे मुसलमान दिसून येतं हे स्वीट पॉयझन आहे संजय गायकवाड नावाचा पादरी येतो आणि 3 तास तिथे बसतो. गायकवाड वर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी पडळकर यांनी केली. मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली त्याला बडतर्फ केले पाहिजे. देसाई नावाचा अधिकारी याला पाठीशी घालतो. तत्काळ गुन्हा दाखल करून बडतर्फ करा असे पडळकर म्हणाले.