मुंबई : राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील सुमारे 30हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान मिळणार असून यासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी तरतूद करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात पावणे तीनशे कोटींची तरतूद यासाठी केली जाणार आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत निवेदन केले. शिक्षणमंत्री तावडे यांनी विधानपरिषदेत केलेल्या उपरोक्त घोषणेचा लाभ राज्यातील सुमारे 30000 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना होणार आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये उपरोक्त बाबींची सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करुन आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संबंधीची तरतूद करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही  तावडे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले. तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध अधिवेशन संपल्यानंतर पुढील 15 दिवसात मंत्रिमंडळाच्या मान्यतेकरीता सादर करण्याची देखिल घेाषणा तावडे यांनी आज केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार, शिक्षक परिषदेचे अध्यक्ष आदींची बैठक आज विधानभवनात पार पडली. यावेळी गृहराज्यमंत्री रणजित पाटील उपस्थित होते. यावेळी शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदारांनी शिक्षकांची वास्तव बाजू बैठकीत मांडली. कसे मिळणार अनुदान
अ.क्र. शाळांचा प्रकार शाळा/तुकड्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी संख्या
1 अघोषित प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा व तुकड्या आणि कार्योत्तर मान्यता अट शिथिल केल्यास पात्र होणाऱ्या उच्च माध्यमिक शाळा/घोषित उच्च माध्यमिक शाळा/तुकड्या 1279 शाळा 1867 तुकड्या 9,901 शिक्षक 411  शिक्षकेत्तर 11 अर्धवेळ शिक्षक
2 19 सप्टेबर, 2016 अन्वये 20 टक्के अनुदान प्राप्त शाळा व तुकड्यांना पुढील 20  टक्के अनुदान देणेबाबत. 1628 शाळा 2452 तुकड्या 14,363  शिक्षक 4884 शिक्षकेत्तर
उपरोक्त सर्व बाबींकरीता अंदाजे येणारा खर्च- रु. 275 कोटी पर्यंत 2907 शाळा, 4319 तुकड्या 23807 शिक्षक 5352 शिक्षकेत्तर