गोंदिया : नक्षलवाद्यांनी घातपात घडवण्यासाठी पुरून ठेवलेला स्फोटक पदार्थ जप्त करण्यात गोंदिया पोलिसांना यश आल्याने मोठी दुर्घटना टाळली. विशेष म्हणजे आजपर्यंत गोंदिया जिल्यात नक्षलवाद्यांनी कधीही न वापरलेला टायमर बॉम्ब पहिल्यांदाच वापरण्याचं कारस्थान पोलिसांनी उधळून लावलं.


छत्तीसगढ राज्याच्या सुकमा जिल्यात झालेल्या नक्षली हल्ल्यात 25 जवान शाहीद झाले आहेत. तर अनेक जवानांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यातच गडचिरोली जिल्ह्यातील कोरची दलमच्या नक्षलवाद्यांनी गोंदिया जिल्ह्यातील किशोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारनोली-बोरटोला गावच्या रस्त्यात नक्षली पत्रक लावून ठेवलं.

बोरटोला गावातील पोलीस पाटलांनी याची माहिती गोंदिया पोलिसांना दिली. पोलिसांचं एक पथक नक्षलवाद्यांनी लावलेला बॅनर काढण्यासाठी गेलं. मात्र बॅनरपासून 12 फूट अंतरावर नक्षलवाद्यांनी स्फोटकं पेरून ठेवल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी बॉम्बशोधक पथकाला याची तात्काळ माहिती दिली.

पथकाने बॅनरपासून 30 फूट अंतरावर तीन ठिकाणी नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेली स्फोटकं शोधून काढली. 4 किलो द्रव्य स्फोटक, दोन डिटोनेटर, एक बॅटरी, 500 फुटाच्यावर विजेचा तार, स्टीलचे ड्रम आणि आजपर्यंत आणि तीव्र शक्तीचा टायमर बॉम्ब जप्त करण्यात आला.

याआधी देखाली नक्षलवाद्यांनी जिल्यात विविध ठिकाणी घातपात घडवून आणण्यासाठी अनेकदा स्फोटकं पेरून ठेवली. मात्र जप्त करण्यात आलेल्या स्फोटकातील टायमर बॉम्ब हा इतका शक्तीशाली आणि प्रोफेशनल मॅकेनिक पद्धतीने आयटी सेक्टरची मदत घेऊन तयार करण्यात आलेला असल्याचा अंदाज पोलिसांना आहे.

सुकमा नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोंदिया पोलिसांनी संपूर्ण जिल्यात हायअलर्ट जारी केला आहे. जिल्यात कुठेही सार्वजनिक ठिकाणी एखादी वस्तू संशयास्पदरित्या आढळून आल्यास त्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना देण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

नक्षलवाद्यांनी बाबू व्यापारी आणि तेंदू पत्ता व्यापारी यांच्या, आणि पोलिसांकडून नक्षलविरोधी जनजागृती अभियान चालवण्यात येत असल्याचा विरोध गोंदिया जिल्याच्या बोरटोला गावात मिळालेल्या नक्षली पत्रकामध्ये पत्रकाद्वारे केला आहे.

संबंधित बातम्या :

सुकमा हल्ला: गुप्तचर यंत्रणेची मोठी चूक?


5 नक्षल्यांना ठार करणारे जवान शेर मोहम्मद जखमी


सुकमा हल्ला : 25 CRPF जवानांच्या हत्याकांडाचा मास्टरमाईंड कोण?


छत्तीसगडमध्य़े 300 हून अधिक नक्षलवाद्यांचा हल्ला, CRPF चे 25 जवान शहीद