Gondia Crime news : गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक परिसरात मेकअप स्टुडिओच्या नावावर सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. बळीराम बस्ताराम घोटेकर (35) व दिलीप बस्ताराम घोटेकर (32) दोघेही राहणार रेलटोली, गोंदिया असे आरोपींचे नाव आहेत. गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक परीसरातील बसस्थानकासमोर असलेल्या मॉस मेकअप स्टुडिओ अँड द बॉडीस् स्पा सेंटर मध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखाच्या अधिकार्यांना मिळाली होती. या आधारे पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात बेटा बचाव राष्ट्रीय अभियान व नशा हटाव, बेटा बचाव संस्थेचे जिल्हा अध्यक्ष यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर स्पा सेंटर परीसरात सापळा रचून छापामार कारवाई केली. यावेळी पथकाला एका खोलीत ग्राहकासोबत एक महिला दिसून आली. दरम्यान,सेंटरची पाहणी केली असता पहिल्या माळ्यावर पुन्हा 4 महिला मिळून आल्या. यावेळी सदर महिलांनी आरोपी बळीराम घोटेकर व त्याचा भाऊ दिलीप हे दोघेही स्वतःच्या आर्थिक लाभाकरीता त्यांना पैशांचे आमिष देऊन स्पा सेंटर मध्ये वेश्या व्यवसाय करायला लावत असल्याचे सांगितले.
दोन्ही आरोपींच्या विरोधात गोंदिया शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने आरोपी बळीराम घोटेकर व त्याचा भाऊ अरोपी दिलीप घोटेकर या दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी दोन्ही आरोपींच्या विरोधात गोंदिया शहर पोलिस ठाण्यात कलम 3,4,5.6 अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वीच पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार सुरु प्रकरणी कारवाई
दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये देखील अशीच घटना घडली होती. पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.. पुणे पोलिसांनी (Pune Police) या प्रकरणी कारवाई करत 18 मुलींची सुटका केली होती. पुण्यातील उच्चभ्रू बाणेर आणि विमानतळ भागात पोलिसांनी छापेमारी केली. या छापेमारीमध्ये 18 मुलींपैकी 10 पेक्षा अधिक मुली परदेशी नागरिक असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापेमारी केली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, परिमंडळ 4 अंतर्गत येणाऱ्या पुण्यातील बाणेर आणि विमानतळ परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या: