Gondia Crime News : गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फसणारी घटना घडली आहे. डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बापाने स्वतःच्या 14 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करून गर्भवती केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डुग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये आरोपी बापावर लैंगिक बाल शोषण प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.
आरोपीची पत्नी गेल्या 10 वर्षांपासून माहेरी राहत होती
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी अंदाजे 10 वर्षांपासून माहेरी राहत असून आरोपीसोबत घरात मुलगी, मुलगा आणि त्याची आई राहत होती. मुलगी लहान असल्याने बापासोबतच झोपत होती आणि याच निरागस विश्वासाचा फायदा घेत आरोपी बापाने विकृतपणे तिच्यावर अत्याचार केला. काही महिन्यांपासून पोटात अस्वस्थता जाणवल्यानंतर मुलीला गोंदियातील महिला रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीदरम्यान मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. यानंतर पोलिसांत तात्काळ गुन्हा नोंदवण्यात आला अजून आरोपी बापाला पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली
दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. बाप लेकीच्या नात्लायाला काळीमा फासणारं कृत्य बापानं केलं आहे. या प्रकरणी लगेच पोलिसांनी आरोपी बापाला अटक केले आहे.
आरोपीला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 नोव्हेंबर 2025 रोजी 14 वर्षीय अल्पवयीन पीडितेने स्वत:च्या बापाने अत्याचार केल्याबाबतची तक्रार दिली होती. त्यावरुन पोलीस स्थानकात गुन्हगा दाखल करण्यात आला आहे. कलम 64 (2) बाल लैंगिक अत्याचार आदीनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. यानंतर आरोपी बापाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. आरोपीला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या: