Gokul Milk : दूध उत्पादकांना दिलासा! गोकुळकडून गाई आणि म्हशीच्या दूध दरात वाढ, शेतकऱ्यांना किती फायदा?
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड (गोकुळ) ने म्हैस आणि गाईच्या दूध विक्री आणि खरेदी दरामध्ये वाढ करण्यात आली आहे.
Gokul Milk Price News : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड (गोकुळ) ने म्हैस आणि गाईच्या दूध विक्री आणि खरेदी दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. म्हशीच्या दुधासाठी प्रति लिटर 1 रुपयांनी आणि गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर 2 रुपयांची खरेदी वाढ केली आहे. याआधी म्हशीचे दूध प्रति लिटर 52.50 पैसे दराने खरेदी केले जायचे आता 53.50 रुपयांनी खरेदी केले जाणार आहे. तर गायीचे दूध 34 रुपयांनी खरेदी केले जायचे आता 36 रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदी केले जाणार आहे. यामुळं शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
गोकुळ कडून म्हशीच्या दूध विक्री दरामध्ये दोन रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. याआधी म्हशीचे दूध 68 रुपयांनी विकले जात होते मात्र आता ते 70 रुपयांनी प्रतिलिटर विकले जाणार आहे. आज संध्याकाळ पासून नवे दर लागू होणार आहेत. गोकुळ संचालकांच्या बैठकीमध्ये दूध दरवाढीसंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Bhiwandi Mayor: दूधविक्रेता ते बांधकाम व्यावसायिक, भिवंडीत भाजपला धक्का देणारे महापौर नारायण चौधरी कोण?
























